naralikar conferred asis first govind swarup lifetime achievement award pune
naralikar conferred asis first govind swarup lifetime achievement award pune sakal
पुणे

Pune : प्रा. नारळीकरांना डॉ. गोविंद स्वरूप जीवनगौरव पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्राचे (आयुका) संस्थापक आणि प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ प्रा. जयंत नारळीकर यांना पहिल्या ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया (एएसआय) गोविंद स्वरूप जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या वर्षाच्या सुरुवातीला भारतीय तंत्रज्ञान संस्था इंदूर (आयआयटी) येथे झालेल्या एएसआयच्या ४१ व्या बैठकीत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. मात्र, प्रा. नारळीकर तो स्वीकारण्यासाठी प्रवास करू शकले नाहीत. एएसआयचे अध्यक्ष प्रा. दीपंकर बॅनर्जी यांनी पुण्यात येऊन प्रा. नारळीकर यांना हा पुरस्कार प्रदान केला.

खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकीमध्ये अतुलनीय योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञाला गौरविण्यासाठी भारतीय खगोलशास्त्र संस्थेने गोविंद स्वरूप जीवनगौरव पुरस्काराची स्थापना केली. याप्रसंगी बोलताना प्रा. बॅनर्जी म्हणाले, ‘‘प्रा. स्वरूप आणि प्रा. नारळीकर या दोघांनीही खगोल भौतिकशास्त्राच्या वाढीसाठी देशात आदर्श संस्था उभ्या केल्या.

दोघांची कार्यक्षेत्रे जरी भिन्न असली तरी त्यांनी तरुण पिढीच्या प्रशिक्षणासाठी प्रचंड परिश्रम घेऊन अमूल्य योगदान दिले. हे दोघे महान संशोधकांनी भावी अनेक पिढ्यांसाठी आदर्शवत कार्य केले आहे, करत आहेत.’’ यावेळी आयुकाचे संचालक आर. श्रीआनंद उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Supriya Sule : आईवर बोलला तर करारा जबाब देईन - सुप्रिया सुळे

Arvind Kejriwal : ''केजरीवाल अन् सिसोदिया यांच्याविरोधात एकसारखेच पुरावे कसे? सिंघवींचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

Rahul Gandhi: राहुल गांधींनी रायबरेली निवडल्यानं निरुपम यांचा हल्लाबोल; म्हणाले, पळून गेले...

SRH vs RR, IPL 2024: 'भयानक अंपायरिंग...', हेडची बॅट हवेत होती असं सांगत माजी भारतीय क्रिकेटरने थर्ड अंपायरवर साधला निशाणा

SCROLL FOR NEXT