पुणे

नारायण साईची याचिका फेटाळली

CD

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता.७ - स्वयंघोषित धर्मगुरू आसाराम बापू याचा मुलगा नारायण साई याची जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती देण्याच्या विनंतीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. साई यांच्या दोषसिद्धीविरोधात असलेले अपील गुजरात उच्च न्यायालयाने तीन महिन्यांच्या आत निकाली काढण्याचे प्रयत्न करावेत, असे निर्देश न्या. एम. एम. सुंदरेश आणि न्या. पी. बी. वराले यांच्या खंडपीठाने दिले आहेत.
न्यायालयाने आसाराम बापू यांचा अंतरिम जामीन अर्ज अलीकडेच फेटाळला होता. दोषसिद्धीला आव्हान देत दाखल केलेल्या याचिकेची लवकर सुनावणी घेतली जावी, असा अर्ज देऊनही त्यावर कार्यवाही झालेली नाही, असा मुद्दा नारायण साई यांचे वकील एन. हरिहरन यांनी खंडपीठासमोर मांडला. यावर उच्च न्यायालयामध्ये तीन महिन्यात खटला मार्गी लागला नाही तर आपले अशील पुन्हा सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतात, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farm Loan Waiver: कर्जमाफीचा पहिला हप्ता अखेर वितरीत, नवीन कर्ज लगेच मिळणार का? मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितलं!

Vaibhav Sooryavanshi: भारताच्या कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी वैभव सूर्यवंशी सज्ज; नागपूरात पोहोचला... कोणाची मदत घेतोय?

Abhijeet Dipke: सरकारची अमेरिकन कंपनीच्या मदतीने दिपकेवर पाळत? वैयक्तिक माहिती प्रदर्शित केली?

Marathi News Live Updates : पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; भरधाव वाहन दोन वेळा पलटी

Palghar News: पोषण आहाराला कात्री, डहाणूतील ३५ आश्रमशाळांमध्ये चपातीचा पुरवठा बंद

SCROLL FOR NEXT