पुणे

‘कांदळी’मुळे प्रत्यक्ष रोजगाराची संधी : बेनके

CD

नारायणगाव, ता. १९ : ‘‘माजी आमदार स्व. वल्लभशेठ बेनके यांनी स्वनिधी जमा करून कांदळी येथे उभारलेल्या औद्योगिक वसाहतीमुळे ग्रामीण भागातील अनेक युवक लघु उद्योजक झाले आहेत. जुन्नर तालुक्यातील सुमारे दीड हजार नागरिकांना प्रत्यक्ष रोजगाराची संधी मिळाली आहे,’’ अशी माहिती माजी आमदार अतुल बेनके यांनी दिली.

कांदळी येथील वल्लभशेठ बेनके सहकारी औद्योगिक वसाहतीची ४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष अमित बेनके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी अतुल बेनके म्हणाले की, वसाहतीत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, सिमेंट काँक्रीटचे ड्रेनेज, डांबरी रस्ते, कामगार निवास व्यवस्था आदी सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान वसाहतीत सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल.

सामाजिक काम करणाऱ्या नारायणगाव येथील नव दिव्यांग फाउंडेशनच्या संस्थापिका संगीता बडेरा, सहयगिरी रेस्क्यु टीम मुरबाड, शिवजन्मभूमी रेस्क्यु टीम जुन्नर यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. औद्योगिक वसाहतीच्या वतीने नव दिव्यांग फाउंडेशनला एलईडी टीव्ही तर मुरबाड व जुन्नर येथील रेस्क्यु टीमला २२ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.
या वेळी आर्किटेक्ट अरविंद ब्रह्मे, माजी जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले, बबनराव तांबे, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विकास दरेकर, धनश्री बेनके, वसाहतीचे उपाध्यक्ष भाऊसाहेब काशिद, संचालक उत्तम निमसे, विलास बोऱ्हाडे, रवींद्र बाम्हणे, उमेश शिंदे, अनिल थोरात, स्वाती टाकळकर, मंगल सचिन दाते, मल्हारी कुटे, अशोक खांडगे, अतुल कुलकर्णी यांच्यासह वसाहतीतील उद्योजक उपस्थित होते. अहवालाचे वाचन संस्थेचे सचिव तुषार पडवळ यांनी केले.

दिवंगत वल्लभशेठ बेनके यांनी चाळीस वर्षांपूर्वी कांदळी येथील उजाड माळरानावर औद्योगिक वसाहतीची स्थापना केली. शासनाच्या वतीने कोणतीही आर्थिक मदत मिळत नसल्याने स्वनिधी उभारून अनेक अडचणींवर मात करत वसाहत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. संस्थेने ६१ लघु उद्योजकांना ११३ भूखंड वाटप केले आहेत, असे अमित बेनके यांनी सांगितले.

08626

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: पुण्यात FDAची कारवाई, भूम-वाशीतील खवा-पेढा विक्रेते रस्त्यावर; आमदार तानाजी सावंतांकडून प्रश्नाची दखल

रविवारी गुरुचा अश्लेषा नक्षत्रात प्रवेश; 'या' ७ राशींच्या आयुष्यात येणार सुख-समृद्धी

Nilanga Drought: निसर्गाची अवकृपा अन् कृषी विभागाची आकडेवारी; निलंग्यात खरीप पिकांचे १०० टक्के नुकसान, अहवालात ७० टक्केच नोंद

Latest Marathi News Update : शिरपूर तालुक्यात बिबट्याची दहशत; झोपडीत झोपलेल्या महिलेवर हल्ला

करपलेलं सोयाबीन... चाऱ्यासाठी काढणी! शेतात महिलांची धडपड!

SCROLL FOR NEXT