Abdul Sattar esakal
पुणे

Foodpark : नारायणगाव येथे फूडपार्क उभारण्यासाठी प्रयत्न करणार - अब्दुल सत्तार

'एक जिल्हा एक उत्पादन' या उपक्रमांतर्गत टोमॅटो आणि अन्य भाजीपाला उत्पादनावर प्रक्रिया करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील नारायणगाव (ता. जुन्नर) येथे फूडपार्क उभारण्याबाबचा प्रस्ताव सादर करा.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - 'एक जिल्हा एक उत्पादन' या उपक्रमांतर्गत टोमॅटो आणि अन्य भाजीपाला उत्पादनावर प्रक्रिया करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील नारायणगाव (ता. जुन्नर) येथे फूडपार्क उभारण्याबाबचा प्रस्ताव सादर करा. या फूडपार्कसाठी कृषी मंत्री या नात्याने प्रयत्न करेन, अशी ग्वाही राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शनिवारी (ता. १) येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलताना दिली. तसेच जुन्नर तालुक्यातील शिवनेरी आंब्याला फळपीक विमा योजना लागू करण्यासाठी पुढाकार घेऊ, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय कृषी दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कृषी आयुक्त सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, कृषी संचालक कैलास मोते, विस्तार व प्रशिक्षण संचालक दिलीप झेंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, विभागीय कृषी सहसंचालक रफिक नाईकवडी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, कृषी विकास अधिकारी अशोक पवार आदी उपस्थित होते.

सत्तार पुढे म्हणाले, ‘राज्य सरकार हे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. यानुसार सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. शेतीत नव्या तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देण्याबरोबरच नैसर्गिक शेतीवरही भर देण्यात येत आहे. 'नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेंतर्गत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी ६ हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आता केंद्र आणि राज्याचे मिळून दरवर्षी १२ हजार रुपये मिळणार आहेत.’

शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या स्व.वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रासाठी मोलाचे कार्य केले आहे. त्यांनी शेती, औष्णिक वीज निर्मिती, ग्राम विकास, पंचायतराज, रोजगार हमी योजना, जलसंधारण आदी विविध विषयांच्या माध्यमातून माध्यमातून राज्याला दिशा देण्याचा प्रयत्न केला. कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून शेतकऱ्याला मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यांच्या जयंती निमित्ताने शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कृषी विभागाने केला असल्याचे कृषी आयुक्त चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जुन्नर येथील शिवनेरी आंबा आणि पुरंदर अंजिराचे जीआय टॅगिंग करण्यात आले आहे. याचा आता या दोन्ही फळांच्या निर्यातीसाठी लाभ होईल. पीक विविधतेसाठी जिल्ह्यात प्रयत्न करण्यात येत आहे. पीएम किसान योजनेतही जिल्ह्याची कामगिरी चांगली आहे. त्यामुळे नारायणगाव येथे 'एक जिल्हा एक उत्पादन' उपक्रमांतर्गत टोमॅटोसाठी फूड पार्क व्हावा, अशी मागणी आयुष प्रसाद यांनी यावेळी केली होती. सांगितले.

यावेळी सत्तार यांच्या हस्ते पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. टोमॅटो आणि सोयाबीन पिकांची काळजी घेण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना असलेल्या घडीपत्रिकेचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IRCTC Rules: रेल्वे तिकिट बुकिंगचे नवे नियम लागू! आता फक्त 'या' प्रवाशांनाच तिकीटे मिळणार; प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय

IND vs NZ: 'तो' फिट असला, तर टीम इंडियात वॉशिंग्टन सुंदरची जागा घेतली असती... इरफान पठाणने नाव स्पष्टच सांगितलं

Hardballing Dating: क्रिकेट नाही, नात्यांचा खेळ! Gen Z चं 'हार्डबॉलिंग डेटिंग' आहे तरी काय? मानसिक ताणापासून कसं वाचवतं, जाणून घ्या

Chandrapur Municipal Election 2026 : चंद्रपुरात भाजपा सत्ता राखणार? 'या' प्रभागातील लढतीकडे सर्वाचं लक्ष, प्रतिष्ठा पणाला

Latest Marathi News Live Update : सटाण्यात अनैतिक मानवी व्यापाराचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT