Dabholkar Sakal
पुणे

डॉ. दाभोलकरांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी कार्यक्रम

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त समितीतर्फे शनिवारी (ता.२०) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त समितीतर्फे शनिवारी (ता.२०)  विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. घोले रस्ता येथील पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे हे कार्यक्रम होणार आहेत.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या संबंधात गेल्या नऊ वर्षात वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्या, लेख यांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे उद्‌घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते सकाळी साडे दहा वाजता होणार आहे. तर ‘महाराष्ट्रातील संत, समाजसुधारकांची परंपरा आणि अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ’ या विषयावर संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांचे व्याख्यान सायंकाळी सहा वाजता होणार आहे. यावेळी अभिनेते सयाजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

तसेच, ऑल इंडिया पीपल सायन्स नेटवर्क आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वतीने डॉ. दाभोलकर यांचा स्मृती दिन हा ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस’ म्हणून पाळला जातो. केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, दिल्ली, आसाम, पंजाब, तमिळनाडू, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये यानिमित्त प्रचार आणि प्रसार करणारे कार्यक्रम घेतले जाणार आहेत. तर महाराष्ट्रात जिल्ह्या-जिल्ह्यात शनिवारी सकाळी ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ काढण्यात येणार आहे, अशी माहिती समितीतर्फे देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Law and Order : पुण्यात १४ दिवसांसाठी जमावबंदी, पुणे पोलिसांचा मोठा निर्णय, काय सुरू, काय बंद राहणार? जाणून घ्या

Stock Market Today: अमेरिका-इराणचा इफेक्ट! सेन्सेक्स 818 अंकांनी उसळला; कोणते शेअर्स वाढले?

Latest Marathi News Live Update : लैंगिक अत्याचारातील पीडितेनं ॲसिड पिऊन जीवन संपवलं

Bhatkal Creek Accident : खाडीत शिंपले गोळा करताना एकाच कुटुंबावर काळाची झडप; 10 जणांचा बुडून मृत्यू, 'त्या' एका चुकीमुळे गमावला जीव

Gold Rate Today: अमेरिका-इराण तणावात सोनं 14 हजारांनी स्वस्त! आजचा ताजा भाव काय? सोनं स्वस्त होणार की महागणार?

SCROLL FOR NEXT