Dr. Narendra Dabholkar
Dr. Narendra Dabholkar sakal
पुणे

Dr. Narendra Dabholkar : सीबीआयने अंतिम युक्तिवादात बचाव पक्षाचे मुद्दे काढले खोडून

सकाळ वृत्तसेवा

पुणे - महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलाच्या पूर्व बाजूला डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येची घटना घडली आणि टेम्पो हा पश्चिम बाजूने गेला. त्यावेळी मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. म्हणजे जर पश्चिम बाजूने ट्रकमधून मृतदेह नेला असता तर त्या बाजूला रक्त दिसले असते. परंतु, तसा कोणताही पुरावा नाही, असा सीबीआयच्या वकिलांनी युक्तिवाद करीत बचाव पक्षाचे सर्व मुद्दे शनिवारी (ता. १७) खोडून काढले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खून खटल्याची सुनावणी न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात सुरू आहे. त्यामध्ये ‘सीबीआय’तर्फे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांचा सुरू असलेला अंतिम युक्तिवाद शनिवारी पूर्ण झाला.

त्यांनी डॉ. दाभोलकरांची हत्या, त्यांच्याविषयी आरोपींमध्ये असलेली शत्रुत्वाची भावना, गुन्ह्याचा हेतू, ओळख परेड, अतिरिक्त न्यायालयीन कबुली जबाब, शवविच्छेदनाच्या नोंदी, फिर्याद, आरोपींवर शस्त्रास्त्र आणि यूएपीए कायद्यान्वये झालेली कारवाई, आरोपींचे मानसिकतेचे विश्लेषण, गुन्ह्याच्या घटनेची पुनर्रचना, रक्षाबंधनाच्या दिवशी अंदुरे आणि कळसकर आमच्यासमवेत असल्याचा बहिणींनी केलेला दावा अशा मुद्द्यांवर सीबीआय वकिलांनी अंतिम युक्तिवाद करीत बचाव पक्षांचे मुद्दे खोडून काढले.

सोमनाथ धायडे याने गजानन मंदिरासमोर गारखेडा येथे हिंदू जनजागरण समितीची बैठक झाली असल्याची साक्ष न्यायालयात दिली होती. बचाव पक्षाने कडा येथे बैठक झाल्यासंदर्भातील कागदपत्रे जलसंपदा खात्याकडून माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागविली. आमचे म्हणणे होते की, गारखेडा आणि कडा एकच आहे.

मात्र ते साम्य दाखविणारा कोणताही पुरावा नाही. धायडे हा औरंगाबादचाच साक्षीदार होता पण त्याची उलटतपासणी घेण्यात आली नाही. ज्याने माहिती अधिकार कायद्याअंतर्गत कागदपत्रे दिली तो पुरावा रेकॉर्ड केलेला नाही, असे ॲड. सुर्यवंशी यांनी न्यायालयास सांगितले.

तो केस नाही तर धागा -

डॉ. दाभोलकर यांच्या मृतदेहावर एक लांब केस होता. मात्र सर्व साक्षीदारांनी आम्हाला याबद्दल काही माहिती नाही, असे सांगितले. डॉ. तावरे यांनी उलटतातपासणी दरम्यान तो केस नव्हता तर काळा धागा होता असे ठामपणे सांगितले असल्याचेही ॲड. सूर्यवंशी यांनी न्यायालयात सांगितले. दरम्यान, २२ फेब्रुवारी रोजी डॉ. दाभोलकर कुटुंबीयांचे म्हणणे लिखित स्वरूपात त्यांचे वकील अभय नेवगी न्यायालयात सादर करतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Kalyani Nagar Accident :भ्रष्ट चेल्यांनी बदलले तिघांचे रक्तनमुने ; ‘ससून’मधील डॉक्टरांची बनवाबनवी

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

SCROLL FOR NEXT