Narendra-Modi
Narendra-Modi 
पुणे

सईच्या पत्राला पंतप्रधानांचे उत्तर

सकाळ वृत्तसेवा

पुणे - लोकसभा निवडणूक झाली... बहुमताने मोदी सरकार स्थापन झाले... नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून पुन्हा शपथ घेतली... जगभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू होता... मोदींच्या या यशाने भारावलेल्या पुण्यातील एका लहान मुलीनेही कागद-पेन घेतला आणि थेट मोदींना पत्र पाठविले. पत्रातून त्यांचे अभिनंदन केले... या पत्राला आता थेट मोदींच्या स्वाक्षरीसह उत्तर मिळालेय.

या मुलीचे नाव आहे सई गणेश कोरे. तिच्या पत्राला उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणतात की, देशाचा विकास होत आहे. देशात चांगले सरकार आहे, यावरील लोकांचा विश्‍वास यातून दिसून येतो. या विश्‍वासाच्या आधारावरच जनतेने भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मतदारांनी निवडून दिले. आजच्या तरुणाईच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणारा पक्ष म्हणून देशातील 

नागरिकांनी मजबूत सरकारची निवड केली, असे या पत्रात नमूद केले आहे.
‘‘गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकारने भविष्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. ज्यामुळे अनेक सकारात्मक बदल घडले आहेत. सध्या भारतातील प्रत्येक नागरिकाकडे २०२२ पर्यंत घर, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट तसेच भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर देशातील तरुणाईच्या क्षमतेचा वापर करून देशाला जगातील सर्वोच्च स्टार्टअप डेस्टिनेशन बनविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. पक्षाच्या ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्‍वास’ या संकल्पनेखाली आम्ही देशाची प्रगती आणि भ्रष्टाचारमुक्त राष्ट्र करू, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 10 नक्षलवाद्यांच्या मृतदेहांसह शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त

SCROLL FOR NEXT