नऱ्हे आंबेगाव - स्वामी नारायण मंदिराजवळील निसर्ग सौंदर्यने नटलेल्या टेकडीकडे दुर्लक्ष होत आहे.
नऱ्हे आंबेगाव - स्वामी नारायण मंदिराजवळील निसर्ग सौंदर्यने नटलेल्या टेकडीकडे दुर्लक्ष होत आहे. 
पुणे

नऱ्हे-आंबेगाव टेकडीच्या संवर्धनाची आवश्‍यकता

सकाळवृत्तसेवा

धायरी - नऱ्हे येथील स्वर्गीय उत्तमराव पाटील जैवविविधता केंद्राच्या (नऱ्हे - आंबेगाव टेकडी) संवर्धनासाठी नियमित पाण्याचा पुरवठा करावा सोबतच टेकडीवरील ३० हेक्‍टर जागेवर माहिती केंद्र, पदपथ, बटरफ्लाय गार्डन, आयुर्वेदिक झाडांची लागवड करून जैव विविधता निर्माण केली जावी, अशी मागणी टेकडीच्या संवर्धनासाठी झटत असलेल्या विविध ग्रुपद्वारे होत आहे. 

नऱ्हे आंबेगाव टेकडीवर दररोज शेकडो नागरिक येत असतात. या टेकडीचे साधारण क्षेत्रफळ ५० हेक्‍टर आहे. येथे २५०पेक्षा अधिक ट्रेकर्स नियमितपणे एकत्र येऊन वृक्ष संवर्धन करतात. प्रत्येक ट्रेकर्सने झाडांच्या संगोपनासाठी पाच झाडे दत्तक घेतली आहेत. नागरिकांच्या सहभागातून येथे दररोज टॅंकरने पाणीपुरवठा केला जातो. या टेकडीवर पर्यटनासाठी चांगला वाव आहे. या ठिकाणी जाण्यासाठी चांगला रस्ता तयार करण्याची मागणी मॉर्निंग वॉकर्स ग्रुपने केली आहे. टेकडी संवर्धनासाठी झाडे लावा झाडे जगवा, मॉर्निंग वॉकर्स ग्रुप व सिंहगड ट्रेकर्स ग्रुप परिश्रम घेत आहेत. याबाबत आमदार भीमराव तापकीर म्हणाले, माझ्या निधीतून टेकडीवर जैव विविधता केंद्राची निर्मिती केली जाईल. तसेच पर्यटन स्थळ विकसित करण्यात येईल.

टेकडी शहराला लागून असल्याने व स्वामी नारायण मंदिर जवळ असल्याने या ठिकाणी सुंदर पर्यटनाचे ठिकाण होऊ शकते. झाडाच्या संरक्षणासाठी वॉचमन नेमावा. तसेच टेकडीवर जाण्यासाठी जी जागा आहे ती खासगी मालकीची आहे. स्थानिक आमदार व वनविभागाने जागा मालकाशी चर्चा करून रस्त्याचे काम करावे.
- काका चव्हाण, मॉर्निंग वॉकर्स ग्रुप

निधी मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. निधी मिळताच येथील विविध कामांस सुरवात होईल.   
- दीपक खलाणे, वनक्षेत्रपाल, सामाजिक वनीकरण विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुरात शतकाच्या उंबरठ्यावर, सीएसके गाठणार का 200 चा टप्पा

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ओडिशातील लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची काँग्रेसकडून यादी जाहीर

SCROLL FOR NEXT