पुणे

नाशिक-चेन्नई ग्रीनफिल्डसाठी हालचाली

CD

नाशिक- चेन्नई हरितक्षेत्र महामार्गाला वेग
उर्वरित १०७.३३ हेक्टर जमीन संपादनासाठी २१ दिवसांची मुदत
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २४ : बहुचर्चित नाशिक-चेन्नई हरितक्षेत्र महामार्ग प्रकल्पाला गती मिळू लागली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुढील दोन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवत जमीन संपादन प्रक्रियेला वेग दिला आहे. जिल्ह्यातील उर्वरित १०७.३३ हेक्टर क्षेत्र तातडीने संपादित करण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या असून हरकती व सूचनांसाठी २१ दिवसांची मुदत जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे महामार्ग उभारणीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पुढे पडले आहे.
केंद्र सरकारने सूरत-चेन्नई असा सुमारे १२०० किलोमीटरचा हरितक्षेत्र महामार्ग उभारण्याची घोषणा केली होती. मात्र महाराष्ट्रातील काही भागांत शेतकऱ्यांच्या विरोधामुळे प्रकल्पाचे भवितव्य अनिश्चित झाले होते. परिणामी सूरत-नाशिक हा टप्पा वगळण्यात आला. आता नाशिकपासून पुढील टप्प्यांवर भर देण्यात येत आहे.
हा महामार्ग नाशिकमधील आडगाव येथून सुरू होऊन अहिल्यानगर, धाराशिव, सोलापूर आणि अक्कलकोटमार्गे पुढे जाणार आहे. जिल्ह्यातील नाशिक, निफाड आणि सिन्नर या तीन तालुक्यांतील ३० गावांमधून हा मार्ग जाणार असून एकूण ३८७.३३ हेक्टर क्षेत्र संपादित करणे अपेक्षित आहे. त्यापैकी २८० हेक्टर क्षेत्राचे संपादन पूर्ण झाले असून उर्वरित १०७.३३ हेक्टर जमीन संपादित होणे बाकी आहे. या विलंबामुळे प्रकल्पाची गती मंदावली होती. प्राधिकरणाने आता रखडलेली प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील १६०.३ ते १७२.६ किलोमीटरदरम्यानच्या पट्ट्यातील जमीन संपादनासाठी हरकती व सूचना नोंदविण्यासाठी २१ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. प्राप्त हरकतींवर सक्षम अधिकाऱ्यांमार्फत सुनावणी होऊन संबंधित ठिकाणीच निर्णय दिला जाणार आहे. त्यामुळे प्रक्रियेत पारदर्शकता आणि वेग अपेक्षित आहे.
महामार्ग पूर्ण झाल्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा दक्षिण भारताशी थेट व जलद संपर्क प्रस्थापित होणार आहे. औद्योगिक तसेच कृषी क्षेत्राला याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. विशेषतः द्राक्ष, कांदा आणि इतर शेतीमालाच्या वाहतुकीसाठी हा मार्ग उपयुक्त ठरणार आहे. दोन वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार प्रशासनाने व्यक्त केला असला, तरी उर्वरित जमीन संपादन प्रक्रिया वेळेत आणि सुरळीत पूर्ण होणे हीच आता या महामार्गाच्या यशाची खरी कसोटी ठरणार आहे.
या गावांतून जाणार मार्ग
नाशिक तालुका : आडगाव, विंचूरगवळी
निफाड तालुका : चेहडी, वऱ्हेदारणा, लालपाडी, दारणासांगवी, सावळी, चाटोरी, रामनगर, पिंपळगाव निपाणी, तळवाडे
सिन्नर तालुका : देशवंडी, पाटपिंपरी, बारगाव पिंपरी, निमगाव सिन्नर, गुळवंच, देवपूर, खोपडी, फर्दापूर, धारणगाव, भोकणी, पांगरी, फुलेनगर, वावी, घोडेवाडी, कहांडळवाडी
--------------
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
नाशिक ते अक्कलकोट : ३७४ किलोमीटर
१५२ किलोमीटर मार्ग : ७० मीटर रुंदीचा
२२२ किलोमीटर मार्ग : ६० मीटर रुंदीचा
दऱ्याखोऱ्यांतून ५.६ किलोमीटरचा विशेष मार्ग
२७ मोठे आणि १६४ लहान पूल
जोडरस्त्यांची एकूण लांबी १८.२५ किलोमीटर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात बेसिक पे 69000 रुपये, वार्षिक वाढ 6 टक्के; 51 पानांचं निवेदन

Radhanagari Bee Attack: रक्षाविसर्जनाला कावळ्याची वाट पाहणं पडलं महागात! कावळ्यासोबत मधमाशा आल्या अन्; १०० जखमी तर १२ गंभीर, लोकांना पळता भुई थोडी, व्हिडिओ व्हायरल

Ruturaj Gaikwad: 'काळजी नको, लवकरच मी...', ऋतुराज खराब फॉर्मवर स्पष्ट बोलला; CSK च्या खराब फिल्डिंगबद्दल काय म्हणाला?

Latest Marathi News Live Update: नेस्को सेंटर मध्ये ड्रग्स पार्टी प्रकरणात लायझनिंग करणारा इंद्रजीत सिंग याला तात्काळ अटक करा; मनसेची मागणी

चौधरी बिहारचे नवे 'सम्राट', मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ; दोन उपमुख्यमंत्र्यांचाही शपथविधी, नितीशकुमार उपस्थित

SCROLL FOR NEXT