काजळे, पाटील यांना आज
न्यायालयात हजर करणार
नाशिक, ता. १० : शहरातील ४९ गृहप्रकल्पांमध्ये म्हाडा सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी २० टक्के राखीव क्षेत्र ठेवण्याच्या नियमाला फाटा देत बनावट दस्तऐवजाद्वारे म्हाडाची फसवणूक प्रकरणी अटक करण्यात आलेले भूमिअभिलेख कार्यालयाचा उपअधीक्षक बिपीन पाटील (५५, रा. सार्थक हाईटस्, काळेनगर, आनंदवल्ली), महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहायक संचालक कल्पेश पाटील (४३, रा. नाशिक) या दोघांना उद्या (ता. ११) नाशिक जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान, संशयितांनी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करीत विकासकांच्या लाभासाठी कागदपत्रांमध्ये फेरफार करीत शासन व म्हाडाची फसवणूक केली आहे. तसेच, महसुलच्या आणखी काही अधिकारी पोलिसांच्या रडारवर असल्याचे समजते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.