पुणे

पाण्याच्या स्रोतांचे मॉन्सूनपूर्व सर्वेक्षण

CD

नसरापूर, ता. १७ : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित पाणी मिळावे व संभाव्य जलजन्य आजारांना वेळीच अटकाव घालता यावा, यासाठी नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने सर्व उपकेंद्रांमधील गावांमध्ये मॉन्सूनपूर्व पिण्याच्या पाण्याची रासायनिक तपासणी आणि मुख्य पाणीपुरवठा स्रोतांचे सविस्तर स्वच्छता सर्वेक्षण पूर्ण केले आहे.
पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे डायरिया, गॅस्ट्रो, काविळीसारख्या जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. हे धोके टाळण्यासाठी प्रशासनाने आधीच कंबर कसली आहे. या मोहिमेअंतर्गत गावागावांमधील विहिरी, कूपनलिका आणि सार्वजनिक पाण्याच्या टाक्या अशा मुख्य स्रोतांची बारकाईने तपासणी करण्यात आली.
भोर तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभय तिडके यांच्या सूचनेनुसार प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. मिलिंद अहिरे व डॉ. पद्मवीर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली.
आरोग्य सहाय्यक बाळासाहेब पिसाळ यांच्या आराखड्यानुसार आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावामध्ये प्रसाद चव्हाण (हातवे बु.), संतोष सोनवणे (कापूरहोळ), अक्षय बन्ने (शिवरे व केळवडे), रोहन पगारे (कासुर्डी गुं मा), सूरज साळुंखे (वेळू), सुमित चडचणकर (जांभळी), शुभम गायकवाड (देगांव), नितीन पाटील (नसरापूर) या आरोग्य सेवकांनी प्रत्यक्ष सर्वेक्षण आणि जलसुरक्षकांना सोबत घेऊन पाण्याचे नमुने घेतले
दरम्यान, नागरिकांनीही पाणी उकळून व गाळून प्यावे आणि आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mehbooba Mufti: जम्मू काश्मीर भरताचाच अविभाज्य भाग म्हटलेल्या अमेरिकेच्या राजदूतांवर महबूबा मुफ्ती नाराज, स्पष्ट शब्दांत म्हणाल्या...

Mumbai News: कांजूरमार्गात धावत्या लोकलच्या छतावर चढला तरुण; OHE वीजपुरवठा बंद, रेल्वे सेवा विस्कळीत

Pune Civic Warning: पुण्यात खड्ड्यांचे साम्राज्य; आठ दिवसांत खड्डे बुजवा, नाहीतर रस्त्यावर उतरून आंदोलनाचा स्थायी समिती अध्यक्षांचा इशारा

Kondhwa Anti-Drug Action: कोंढव्यात अंमली पदार्थविरोधी मोठी कारवाई; गांजा खरेदीसाठी आलेले ६१ जण ताब्यात, दोन सराईत विक्रेते अटकेत

Pune Noise Control: डीजे मुक्त गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांचा साऊंड तपासणी उपक्रम; कर्णकर्कश ध्वनी रोखण्यासाठी सर्वपक्षीय बैठक

SCROLL FOR NEXT