NATA Entrance Exam 2023 First Year Architecture Admission started education pune
NATA Entrance Exam 2023 First Year Architecture Admission started education pune esakal
पुणे

NATA Entrance Exam : प्रथम वर्ष आर्किटेक्चर प्रवेशासाठीच्या नाटा प्रवेश परीक्षेची नोंदणी सुरु

- मिलिंद संगई

बारामती : आर्किटेक्चरच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर (नवी दिल्ली) यांच्यामार्फत नॅशनल एप्टीट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर (नाटा) या प्रवेश परीक्षेची नावनोंदणी सुरु झाली आहे.

आर्किटेक्चर पदवीचा अभ्यासक्रम पाच वर्षांचा आहे. शैक्षणिक वर्ष 2023-2024 मध्ये आर्किटेक्चरची प्रवेश परीक्षा नाटा विद्यार्थ्यांना तीन वेळा देण्याची सोय असून प्रथम परीक्षेचा ऑनलाईन नोंदणीचा कालावधी 20 मार्च 2023 ते 10 एप्रिल 2023 असून सदर पहिली परीक्षा 21 एप्रिल 2023 रोजी होईल. दुसरी परीक्षा 28 मे 2023 आणि तिसरी परीक्षा 9 जुलै 2023 रोजी घेण्यात येईल. सदर नाटा परीक्षेच्या नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी www.nata.in या संकेतस्थळाचा आधार घ्यावा.

सदर नाटा परीक्षेसाठी 12 वी विज्ञान मान्यताप्राप्त मंडळाची परीक्षा गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र (पीसीएम) हा ग्रुप घेऊन परीक्षेस बसलेले तसेच 10+2 महाराष्ट्र राज्य टेक्निकल बोर्डाचा डिप्लोमा गणित विषय घेऊन परीक्षेस बसलेले विद्यार्थी नाटा परीक्षेस पात्र आहेत. अधिक माहितीसाठी विद्या प्रतिष्ठानचे स्कूल ऑफ आर्किटेक्चर, बारामती येथे सकाळी 10 ते 5 या वेळेत भेटण्याचे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : भाजप पुन्हा सत्तेत आल्यास ते राज्यघटना फेकून देतील, राहुल गांधी यांचा आरोप

SCROLL FOR NEXT