road accident sakal media
पुणे

नवले पुलाखाली पुन्हा अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

विठ्ठल तांबे

नवले पुलाखाली गेल्या २४ तासातील हा दुसरा अपघात आहे. सकाळी सातच्या सुमारास बोअरवेलच्या गाडीने दुचाकीला धडक दिली.

धायरी - नवले पुलाजवळ पुन्हा एकदा अपघात झाला असून सलग दुसऱ्या दिवशी आणखी एकाचा मृत्यू झाला. दुचाकीवरून निघालेल्या पुरुषाच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नवले पुलाजवळ घडली.

प्राथमिक माहिती नुसार, अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव विजय रंगनाथ कुलकर्णी असं असून ते वडगांव बुद्रुकमधील ऑरा सोसायटीत राहत होते. पूजेचे साहित्य घेऊन दुचाकीवरून विजय कुलकर्णी हे सकाळी सात वाजता कात्रजच्या दिशेने जात होते. दरम्यान बोअरवेल ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ह्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना अण्णा वडेवाले हॉटेल समोर घडली. अपघातानंतर ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस करीत आहेत.

२४ तासात दुसरा अपघात

नवले पुलाखाली गेल्या २४ तासातील हा दुसरा अपघात आहे. सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास अपघात झाला होता. यामध्ये पुजा कांबळे नावाच्या मुलीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा आज सकाळी अपघातात एकाने प्राण गमावला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT