accident logo accident logo
पुणे

नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; एकाला चारचाकीने चिरडल्याने जागीच मृत्यू

अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल

विठ्ठल तांबे

धायरी: नऱ्हे येथील नवले पुला खालील सेवा रस्त्यावर अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तीचे ओळख अद्याप पटली नसून ही घटना  दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास नवले पुलाजवळ घडली. 

मिळालेल्या माहितीनुसार, नवले पुलाजवळ एक पादचारी जात असताना अज्ञात वाहनाने त्याला जोराची धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक नितीन जाधव,अमोल काळे व कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. या अपघातात मृत्यू पावलेल्या तरुण बेवारस तसेच वेडसर असल्याचे त्याच्या कपड्यावरून दिसत आहे. याबाबत सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पुढील तपास सिंहगड रस्ता ठाण्याचे पोलीस  करीत आहेत.

पोलिसांनीच उचलला मृतदेह ...

घटनास्थळी मृतदेहाचे काही अवशेष रस्त्यावर पडले होते. रस्त्यावर मृतदेह असल्याने पोलिसांनी काही काळ वाहतूक थांबविली होती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT