शिल्प साकारताना शिल्पकार सुप्रिया शिंदे.
शिल्प साकारताना शिल्पकार सुप्रिया शिंदे. 
पुणे

#Navdurga निर्जीवात जीव ओतणारी शिल्पकार सुप्रिया

नीला शर्मा

समाजाला संजीवनी देत नवचैतन्य जागवणाऱ्या सर्जनशील महिलांच्या रचनात्मक कामाची ओळख नवरात्रीनिमित्त आजपासून...

निर्जीव भासणाऱ्या माती, फायबर किंवा ब्राँझ धातूला सुप्रिया शिंदे या तरुणीच्या हातांचा स्पर्श होताच किमया घडते. त्यातून जिवंत वाटणारी सुरेखशी अर्थपूर्ण शिल्पं आकाराला येऊ लागतात. त्या कलाकृतींमधला भावनाविष्कार बघणाऱ्याला भुरळ पाडतो. 

‘मी छोटी असताना वडिलांना गणपतीच्या मूर्ती घडवताना  पाहायचे. त्यांच्या गणेशमूर्ती कारखान्यात मूर्ती रंगवून द्यायचे. भरपूर चित्रं काढायचे. माझ्या चित्रांमध्ये शरीररचना एवढी बरोबर कशी, याचं वडलांना नवल वाटायचं. तीच मुलगी आता पुतळे घडवत तिची कला राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावी, यासाठी  धडपडते आहे, याचं आई-बाबांना प्रचंड कौतुक वाटतं.’ हे सांगताना सुप्रिया शिंदे ही शिल्पकार तरुणी भारावून जाते. 

मंचरसारख्या ग्रामीण भागातली ही माहेरवाशीण लग्नानंतर घरसंसार, मुलंबाळं यांच्यात गुरफटून गेली. मात्र तिच्यातल्या सर्जनशील कलावंत स्त्रीची आतल्या आत घुसमट होत होती. तिचे जीवनसाथी शेखर खूपच समंजस. नोकरी करतात, पण सुप्रियासाठी त्यांनी गणेशमूर्तीचा कारखाना सुरू केला. तिच्या क्षमतेची जाणीव असल्यामुळे तिच्या कलेचा परीघ वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिले. 

पुण्यात घराजवळच्या भारती विद्यापीठातील कला महाविद्यालयात त्यांनी तिला प्रवेश घ्यायचा आग्रह धरला. तिथं पेंटिंगऐवजी सुप्रियाला शिल्पकला खुणावत गेली आणि पदविका परीक्षेत सुप्रिया तिच्या या विषयात महाराष्ट्रातून तिसरी आली. घर, मुले, गणेशमूर्ती कारखाना व महाविद्यालयीन अभ्यास अशा तिहेरी जबाबदाऱ्या पार पाडत तिनं हे यश मिळवलं. तिथून पुढे तिची व्यावसायिक मूर्तिकार म्हणून वाटचाल सुरू झाली.

सुप्रियानं सांगितलं, ‘कधी समोर मॉडेल म्हणून कुणी असतं. काही वेळा फोटोवरून शिल्पं घडवते. कारखान्यात मेटलची फौंड्री आहे. सर्व माध्यमं वापरत असले तरी सध्या फायबर आणि मेटलवर भर आहे.

स्त्रीभ्रूणहत्येसंदर्भातलं ‘अर्थबॅलन्स,’ पर्यावरणावरणासंबंधीचं ’श्वास,’ नात्यांबाबतचं ‘ऋणानुबंध’ यांसारख्या इतरही कलाकृती बघणाऱ्यांना अतिशय आवडल्याचं समाधान वाटतं. माझी आई (लता बंडेश गांजाळे), गावकऱ्यांना, ‘माझी लेक जगावेगळी,‘ असं भरभरून सांगते. 

माझा मुलगा समर्थ आणि मुलगी सिद्धी हे दोघेही माझ्या या कलाविश्वात तासंनतास रमतात. त्यानंही उमेद खूपच वाढते. कात्रज परिसरातील ‘शिल्पसिद्धी’ या माझ्या स्टुडिओतील शिल्पं वेबसाइटच्या माध्यमातून जगभरचे लोक पाहत आहेत. माझ्या शिल्पांना असलेली मागणीही मला उंच भरारी मारण्यासाठी साद घालते. मिळालेले अनेक पुरस्कार माझ्या हातांना शुभेच्छांचं बळ देत आहेत. समाजाचं वास्तववादी, विचार करायला लावणारं प्रतिबिंब साकारणारी महिला शिल्पकार म्हणून मला ओळख निर्माण करायची आहे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT