कुरकुंभ : आदिशक्तीच्या साडेतीन पिठानंतर येणाऱ्या ऐकावन्न पिठात समावेश असलेल्या कुरकुंभ (ता. दौड) येथील फिरंगाई देवीचा नवरात्र उत्सव कोरोना संसर्गाचा धोका लक्षात रद्द करण्यात आला असून, मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार असल्याची अशी माहिती देवस्थानचे मुख्य विश्वस्त राहुल कुलकर्णी यांनी दिली.
नवरात्रोत्सव शनिवारपासून सुरू होत असून कुरकुंभ येथील फिरंगाई देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी राज्याच्या कानाकोपऱ्यातील भाविक गर्दी करतात. हा उत्सव घटस्थापनेपासून नऊ दिवस व त्यानंतर येणार्या पोर्णिमेपर्य॔त चालू असतो.
त्यामुळे नवरात्रातील पाचवी, सातव्या माळेला दर्शनासाठी गर्दी होते. हा गर्दीचा व कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन शासनाच्या आदेशाचे पालन करण्यास्ठी यंदा नवरात्र उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, या कालावधीत देवीचे मंदिर दर्शनासाठी शासनाचे आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याने भाविकांनी गर्दी करू नये असे आवाहन फिरंगाई देवी देवस्थान विश्वसस्थांकडून करण्यात येत आहे.
(संपादन : सागर दिलीपराव शेलार)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.