पुणे

''नाझरे''ची भिस्त मृत साठ्यावर

CD

मोरगाव, ता. २४ : पुरंदर तालुक्याचा पूर्व पट्टा व बारामती तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यासाठी वरदान ठरलेले नाझरे जलाशय पावसाअभावी कोरडे पडू लागले आहे. सध्या हे धरण उपयुक्त पाणीसाठ्याशिवाय केवळ मृत साठ्यावर अवलंबून आहे. याच राखीव पाण्यावर सात प्रमुख पाणीपुरवठा योजना आणि टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा सुरू असून, पावसाने आणखी ओढ दिल्यास या दोन्ही तालुक्यांवर तीव्र पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची शक्यता आहे.
नाझरे पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार, सध्या उपलब्ध असलेला मृत पाणीसाठा ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत पिण्यासाठी पुरेल असा अंदाज आहे. याच पाण्यावर मोरगाव प्रादेशिक योजनेची १६ गावे, जेजुरी नगरपालिका, औद्योगिक वसाहत, तसेच इतर पाच प्रमुख योजनांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. याशिवाय, तालुक्यातील काही गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, हे टँकरही याच जलाशयातून भरले जात आहेत.
गतवर्षी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने हे धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. इतकेच नव्हे, तर अतिरिक्त पाणी कऱ्हा नदीत सोडून इतर तलावही भरण्यात आले होते. याउलट, यंदा मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्या पावसाने दडी मारल्याने धरणाच्या उपयुक्त साठ्यात पाण्याची काहीच आवक झालेली नाही. धरण क्षेत्रात आणि पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला नाही, तर परिस्थिती गंभीर होऊ शकते, कारण या सातही योजनांना पाण्याकरिता दुसरा कोणताही स्रोत उपलब्ध नाही. त्यामुळे खरीप पेरण्यांसोबतच पिण्याच्या पाण्याचे संकट टळावे, यासाठी परिसरातील शेतकरी आणि नागरिक पावसाकडे डोळे लावून बसले आहेत. दरम्यान, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पाणीपुरवठा योजनांचे व्यवस्थापन, ग्रामपंचायती आणि कंपन्यांनी पाण्याचा अपव्यय टाळून ते जपून वापरावे, असे आवाहन नाझरे पाटबंधारे विभागाने केले आहे.

नाझरे जलाशयाची सद्यस्थिती
एकूण क्षमता : ७८८ दशलक्ष घनफूट
उपयुक्त साठा : ५८८ दशलक्ष घनफूट
मृत साठा : २०० दशलक्ष घनफूट
सध्या उपलब्ध : १९७ दशलक्ष घनफूट (केवळ मृत साठा)
ऑगस्टअखेरची गरज : किमान ६० दशलक्ष घनफूट
अवलंबून योजना : ७
दररोज भरले जाणारे टँकर : २० ते २५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli Protest : आमदार यड्रावकरांच्या समर्थकांकडून सैनिक टाकळीच्या आंदोलकांना मारहाण?, शिरोळ तालुका बंदची हाक; तिरंग्याच्या काठीने मारल्याला आरोप

Panvel-Karjat Railway Line: कर्जतहून नवी मुंबई आता आणखी जवळ! नवा रेल्वेमार्ग लवकरच खुला होणार; किती टक्के काम पूर्ण?

Koyna Dam: कोयना धरणाच्या दरवाजातून होणार विसर्ग पुर्णपणे बंद; धरणात सध्या 93.02 टीएमसी पाणीसाठा

Yavatmal Politics: जमिनीवर बसले, काळा चहा घेतला, झुनका-भाकरी खाल्ली; पालकमंत्री संजय राठोडांचा आदिवासी बांधवांसोबत दिवस

Religious Travel: ६ महिने स्केटिंग, ३ महिने सायकलिंग! श्रद्धेला जिद्दीची साथ; बाराही ज्योतिर्लिंगांसाठी निघालेल्या दोन तरुणांची अनोखी कहाणी

SCROLL FOR NEXT