NCP Sharad Pawar  Sakal
पुणे

Sharad Pawar : शरद पवार साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है; खेड-शिवापूर टोल नाक्यावर NCP कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात रविवारी झालेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन नव्याने पक्षबांधणीला सुरुवात

महेंद्र शिंदे

खेड-शिवापूर : "पवार साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है," अशा घोषणा देत "साहेब आम्ही तुमच्यासोबतच आहोत," अशी भावना सोमवारी सकाळी खेड-शिवापूर टोल नाक्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यापुढे व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात रविवारी झालेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन नव्याने पक्षबांधणीला सुरुवात करणार असल्याचे पवार यांनी काल सांगितले होते. त्यानुसार सोमवारी सकाळी शरद पवार पुण्याहून काराडकडे रवाना झाले.

यावेळी पुणे-सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पवार यांचे स्वागत केले. यावेळी येथे मोठ्या संख्येने भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जमा झाले होते.

यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी "पवार साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है," अशा घोषणा देऊन पवार यांचे स्वागत केले. तसेच "काहीही होऊ द्या, साहेब आम्ही तुमच्यासोबत आहोत," ही भावना यावेळी कार्यकर्त्यांनी पवार यांच्यापुढे व्यक्त केली.

माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे, जितेंद्र कोंडे, अभयसिंह कोंडे, अविनाश बांडेहवलदार, नाना धोंडे, संग्राम कोंडे, उल्हास कोंडे, पोपट कोंडे आदी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT