पुणे

नोटाबंदीच्या विरोधात 'राष्ट्रवादी'चे आंदोलन 

सकाळवृत्तसेवा

राज्यात अनेक ठिकाणी चक्काजाम, मोर्चामुळे वाहतुकीची कोंडी; सरकारविरोधात घोषणाबाजी 
पुणे - नोटाबंदीच्या निर्णयाच्या विरोधात आज राष्ट्रवादी कॉंग्रेसने राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करून निषेध केला. मुंबई, पुण्यासह औरंगाबाद, कोल्हापूर, नगर, सातारा आदी ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसने मोर्चा, रास्ता रोको, चक्काजाम आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी केली, तर चक्काजाम आणि रास्ता रोकोमुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली. मुंबई-बंगळूर महामार्गावर आंदोलने झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 

8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हजार रुपये आणि पाचशे रुपयांच्या नोटांवर बंदी जाहीर केली. त्यानंतर देशभरात नोटाबंदीच्या निर्णयाचे पडसाद उमटत असून, ग्रामीण भागात त्याची तीव्रता अधिक आहे. नोटाबंदीला आज दोन महिने पूर्ण झाले. आजही बहुतांशी एटीएम रोकडअभावी बंद असून, बॅंकांतून पैसे काढण्यासाठी तासनतास उभे राहावे लागत आहे, तसेच डेबिट आणि क्रेडिट कार्डसंदर्भात दररोज नवीन जाहीर होणाऱ्या नियमांमुळे सामान्य गोंधळून गेले आहेत. त्यातही आरबीआयकडून नव्याने जारी होणाऱ्या सूचनांमुळे सामान्य नागरिक मेटाकुटीस आला आहे, त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने या निर्णयाचा निषेध करण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन पुकारले होते. त्यानुसार सोमवारी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे स्थानिक खासदार, आमदार आणि नेत्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. 

नाशिकमध्ये बैलगाड्यासह आंदोलन 
नाशिक - नोटाबंदी आणि त्यानंतर उद्‌भवलेल्या परिस्थितीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे नाशिक शहर-जिल्ह्यात रस्त्यावर उतरून सरकारच्याविरुद्ध नारा दिला. तालुकानिहाय झालेल्या आंदोलनावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी "अबकी बार, फेकू सरकार', "पैसे आमचे हक्काचे, नाही कुणाचे बापाचे', "कुठे नेऊन ठेवला पैसा आमचा' अशा घोषणा देण्यात आल्या. शेतकरी हे बैलगाड्या घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते. 

राज्यातील आंदोलन 
पुणे : सासवडला पालिका चौकात रास्ता रोको आंदोलन 
पिंपरी ः शहरात राष्ट्रवादीचा मोर्चा 
औरंगाबाद : राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची क्रांती चौकात घोषणाबाजी 
नेवासा (नगर) : तहसील कार्यालयावर सर्वपक्षीय भव्य मोर्चा 
सातारा : वाढे फाटा येथे रास्ता रोको आंदोलन 
कोल्हापूर : नोटाबंदीविरोधात महामार्गावर चक्काजाम आंदोलन 
लातूर : रेणापूर, अहमदपूर, जळकोटला आंदोलन 

नोटाबंदीच्या निर्णयाने जिल्हा बॅंकेची आणि त्यामुळे शेतकरी जनतेची अडवणूक सरकारने केली आहे. न्यायालयात जाऊनही जिल्हा बॅंकांवरील निर्बंध उठत नाहीत. केंद्र सरकार जाणीवपूर्वक अडवणूक करत आहेत. 
- सुप्रिया सुळे, खासदार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे पहिल्यांदाच काँग्रेसला देणार मत; मतदानापूर्वी केली मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update: भाजपचे उमेदवार पराभूत होणार हे लक्षात आल्याने भाजप सरकारने कांदा निर्यातीचा निर्णय घेतला आहे- राजू शेट्टी

Majhyashi Nit Bolaycha Rap Song: अनीचा आळस आणि आईचा ओरडा; 'या' तरुणानं लिहिलेलं भन्नाट रॅप साँग सोशल मीडियावर घालतंय धुमाकूळ

Summer Trip: उन्हाळ्यात चेरापुंजीला फिरायला जाण्याता प्लॅन करत असाल तर 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या

IPL 2024 DC vs MI Live Score : दिल्लीला दुसरा मोठा धक्का! दोन्ही सलामीवीर परतले पॅव्हेलियनमध्ये

SCROLL FOR NEXT