Yashwantrao Chavan sakal
पुणे

NCP Ajit Pawar : राष्ट्रवादी कॉंग्रेस यापुढे यशवंतराव चव्हाणांचा फोटो वापरणार....

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने या पुढील काळात यशवंतराव चव्हाण यांच्या आदर्शावर वाटचाल सुरु ठेवण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे.

मिलिंद संगई

बारामती - राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने या पुढील काळात यशवंतराव चव्हाण यांच्या आदर्शावर वाटचाल सुरु ठेवण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. या पुढील काळात पक्षाच्या प्रत्येक फलक, बॅनर, होर्डिंग्ज, जाहिराती, प्रचार साहित्यावर यशवंतराव चव्हाण यांचा प्रदेश कार्यालयाने निश्चित केलेला फोटो छापण्याचे निर्देश प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिले आहेत. एका पत्राद्वारे त्यांनी हे निर्देश जारी केले आहेत.

या बाबतच्या पत्रात सुनिल तटकरे म्हणतात, महाराष्ट्राचे शिल्पकार आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेब हे श्री. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रेरणास्थान आहे, आदर्श आहे.

एक सुसंस्कृत राजकारणी म्हणून यशवंतरावजी चव्हाण साहेबांची ओळख आहे. उत्तम लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान महत्त्वाचे आहे. उत्तम राजकारणी, लोकशाहीवादाचे खंदे समर्थक, समता-बंधुता आणि एकता या त्रीसुत्रांचे पाईक असणारे यशवंतरावजी चव्हाण साहेब म्हणजे आपल्या पक्षाची आणि प्रत्येक कार्यकर्त्याची प्रेरणा व ऊर्जा आहे.

माननीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या आदर्शावरच राष्ट्रवादी काँग्रेसची भविष्यातील वाटचाल राहणार आहे. त्यामुळे पक्षाच्या प्रत्येक फलक, बॅनर, होर्डिंग्ज, जाहिराती, प्रचार साहित्यांवर यशवंतरावजी चव्हाण साहेबांचा प्रदेश कार्यालयाने निश्चित केलेला फोटो ठळकपणे छापण्यात यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT