NCP Ajit Pawar left Pune visit halfway fueled political debate Maharashtra political news 
पुणे

Ajit Pawar News : पुणे दौरा अर्धवट सोडून अजित पवार गेले कुठे? या पूर्वीही…

रोहित कणसे

पुणे : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आजपासून दोन दिवस पुणे दौऱ्यावर होते. मात्र दुपारी दोन वाजता पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर ते काही कामानिमीत्त कुठेतरी निघून गेले. त्यांच्या पुढील दौऱ्याबाबत कोणालाही माहिती नाहीये. त्यामुळे अजित पवार नेमकं कुठे गेले याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

सुरक्षा यंत्रणा, स्वीय सहायकालाही माहिती नाही

विरोधी पक्षनेते आज (७ एप्रिल) सकाळी ते पुण्यात दाखल झाले. यानंतर त्यांनी बारामती होस्टेलवर सकाळपासून बैठका देखील घेतल्या तसेच दुपारी दोन वाजता पत्रकारांशी संवाद साधला. मात्र, त्यानंतर दौऱ्यातील कार्यक्रम सोडून ते अचानक काही कामानिमित्त बाहेर गेले. त्यांची सुरक्षा यंत्रणा तसेच स्वीय सहायक यांना देखील त्यांच्या पुढच्या दौऱ्याबाबत कल्पना नसल्याचे सांगण्यात येत आहे. सरकारनामाने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

हेही वाचा - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

कार्यक्रमासाठी निघाले मात्र...

अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर ते त्यांच्या कारने मुंढवा येथील कार्यक्रमासाठी निघाले मात्र कार्यक्रमस्थळापासून अगदी काही मिनीटांच्या अंतरावरून ते दुसरीकडे फिरले. त्यांनी सहकाऱ्यांना मुंढवा येथील कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास सांगितले. पुणे शहर व परिसरात आज अजित पवार यांचे आठ कार्यक्रम होते. उद्या देखील त्यांचे शहरात काही कार्यक्रम आहेत त्यांना तरी अजित पवार उपस्थित राहाणार का याबद्दल प्रश्नचिन्ह आहे.

अजित पवार यापूर्व देखील असेच दौरा अर्धवट सोडून निघून गेल्याचे प्रकार घडले आहेत. मात्र प्रत्येक शुक्रवारी अजित पवार हे पुण्यात असतात. तसेच शनिवारी त्यांचा बारामती दौरा असतो.मात्र आजचा पुणे दौरा अर्धवट सोडला त्यावरुन राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT