Sharad Pawar Dagdusheth Mandir Sakal
पुणे

ब्राह्मण संघटनांच्या भेटीनंतर शरद पवार दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला

शरद पवारांनी स्वतः दर्शनाची इच्छा बोलून दाखवली असल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. रोज कोणत्या न कोणत्या विषयामुळे शरद पवारांचं नाव समोर येतच आहे. मग राज ठाकरेंची सभा असो, केतकी चितळेची पोस्ट असो किंवा ब्राह्मण संघटनांची भेट असो. आता पुन्हा एकदा शरद पवार चर्चेत आले आहेत. याच कारण म्हणजे ते आज दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेणार आहेत. (Sharad Pawar to visit Dagdusheth Halwai Temple)

ब्राह्मण संघटनेच्या भेटीनंतर आता शरद पवार आज पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेणार आहेत. शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी स्वतः ही इच्छा बोलून दाखवली आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे शरद पवारांना जातीयवादी संबोधलं होतं, तसंच ते नास्तिक असल्याची टीकाही त्यांनी केली होती. त्यानंतर काही दिवसांतच ब्राह्मण संघटनांची भेटही शरद पवार यांनी घेतली होती. आणि आता पुण्यात गणपतीच्या दर्शनाला शरद पवार जाणार आहेत.

शरद पवार सहसा एखादं मंदिर किंवा प्रार्थनास्थळी गेलेले दिसत नाहीत. मात्र आता त्यांनी दर्शनाची इच्छा बोलून दाखवल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज ठाकरेंच्या टीकेनंतर आता शरद पवारांनी काही भूमिका बदलली का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. ब्राह्मण संघटनांनी विनंती करत चर्चेचं निमंत्रण दिल्याचं शरद पवारांनी चर्चेनंतर सांगितलं होतं. आणि आता पवारांनी दगडूशेठ हलवाईचं दर्शन घेतल्याची इच्छा व्यक्त केल्याने ही कसली खेळी आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT