पुणे

पुणे : राष्ट्रवादीकडून महापालिकेवर पाण्यासाठी 'घंटानाद आंदोलन'

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पाण्याच्या समस्येवर पुणे महानगरपालिकाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवाजीनगर मतदारसंघाच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. विविध प्रश्नांची कैफियत मांडून महानगरपालिका आयुक्त (जनरल) रुबल अग्रवाल यांना निवेदन देण्यात आले. त्यादरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. 

आयुक्त अग्रवाल यांना निवेदन देताना विविध मागण्या करण्यात आल्या. यामध्ये पाण्याची समस्या लवकर सोडवावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी मॉडेल कॉलनी ,वडार वाडी, शिवाजी हौसिंग सोसायटी ,जनवाडी, गोखलेनगर, डेक्कन,शिवाजी नगर ,बोपोडी परिसरातील नागरिक देखील उपस्थित होते.

आंदोलकांना यावेळी विविध घोषणाबाजी केल्या. पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे! या प्रशासनाचे करायचे काय, खाली डोके वर पाय'! हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे"!
अशा जोरदार घोषणाबाजी व घंटानाद आंदोलनाने पालिका परीसर दुमदुमून सोडला.

यावेळी अंकुश काकडे म्हणाले, की अजितदादा पालकमंत्री असताना पाण्याची टंचाई असूनही पाणी कमी पडू दिले नाही व गेल्या तीन वर्षांत मुबलक प्रमाणात पाणी असूनही पाण्याच्या नियोजनात भाजप सरकार फेल झाली आहे.

श्रीकांत पाटील राजू साने, स्वाती पोकळे, महेश हांडे , रविंद्र ओरसे, मंगला पवार, अनिता पवार, मयूर खेडेकर, गोविंद पवार, श्रीकांत भिसे, शैलेश साठे, औदुंबर खुणे, मधुकर पवार, बाळासाहेब चव्हाण, सौरभ भिलारे, अविनाश भांड, महेश पवार, प्रशांत सावंत यावेळी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल; ईव्हीएमची केली होती पूजा

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update: नरेंद्र मोदी अन् भाजपचा फोकस कोणत्याही किंमतीवर सत्ता मिळवण्यावर - सोनिया गांधी

Ajit Pawar: सोशल मीडिया त्याला चांगला जमतो; लहानपणापासूनच नौटंकी...; Viral Videoवरून अजितदादांचा रोहित पवारांवर निशाणा

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT