Ajit Pawar
Ajit Pawar esakal
पुणे

Ajit Pawar : कारखाने बंद पाडायचा माझा उद्योग नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार

सुवर्णा कांचन

उरुळी कांचन : माझ्यावर आरोप होतात की अजित पवार कारखाने बंद पाडतो. कारखाने बंद पडायचा अजित पवारचा उद्योग आहे का? उलट मी बंद पडलेले साखर कारखाने चालू करतो. गेली तेरा वर्ष बंद पडलेला थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना कुणालाही चालू करता आला नाही.

ना खासदार म्हणून निवडून द्या. मी तुम्हाला खात्री देतो मी कारखाना सुरु करणार. त्यासाठी उसाचे क्षेत्र वाढविण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. उरुळी कांचन (ता. हवेली) येथे महायुतीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या झालेल्या प्रचार सभेत अजित पवार बोलत होते. यावेळी प्रदीप कंद, अपूर्व आढळराव पाटील, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, यशवंत सहकारी साखर कारखाना संचालक, बुध कमिटी सदस्य उपस्थित होते.

यावेळी बोलताना उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, "सर्वात जास्त चर्चेत असणारा मतदार संघ म्हणून शिरूर- हवेली ओळखला जातो. या मतदार संघात विद्यमान खासदारांनी एक रुपयाही निधी आणला नाही. जनतेला वाली हवा आहे. पराभव झाल्यानंतर जी कामे अर्धवट होती ती पूर्ण करण्यासाठी उभा राहिलो आहे. लोकांची करण्यासाठी पुन्हा कार्यरत आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी काहीच काम केलं नाही. वाघोली, हडपसर, पुणे-सोलापूर महामार्ग येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला नाही."

प्रदीप कंद म्हणाले -

- आमचे उमेदवार कोणत्याही चित्रपटात, मालिकेत काम करणार नाही.

- माजी खासदार असताना खूप विकासकामे केली आहेत.

- त्यांच्या कामाची दाखल घेत त्यांना लोकसभेत पाठवा.

कलाकारांना सामाजिक प्रश्नांशी काहीही देणेघेणे नाही

पूर्वी आपण रामायण, महाभारत पाहायचो. त्यातील राम आणि सीता या पात्रात आपण वाहून जायचो. कालांतराने राम आणि सीता हे पात्र करणार कलाकार लोकांना दिसले तरी ते त्यांच्या पाय पडायचे. अभिनेता गोविंदाने ही अनेक चित्रपटात काम केले आहे. कलाकारांना सामाजिक प्रश्नांशी काहीही देणेघेणे नसते. ते विविध भूमिका करत असतात. त्यांच्याकडे लोकांसाठी वेळ नसतो. सामाजिक क्षेत्रात काम करणं हे राजकीय व्यक्तीचं काम असल्याचे वक्तव्य अजित पवार यांनी केले.

शिवाजीराव आढळराव पाटील

- तीन टप्प्यात कांदा निर्यात बंदी उठवली

- विद्यमान खासदारांना गावात प्रचार करू नका म्हणत बारा गावांमध्ये वेशीवरच अडवले.

- खासदार नसताना साडेसातशे गावांना भेट

- अभिनय करून भावनिक आधार

अजित पवार

- उन्हामुळे मतदानाची टक्केवारी कमी. टक्केवारी वाढवा

- देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार निधीसाठी मजबूत

- सत्तर कोटी रिंगरोडचा प्रस्ताव

- सासवड, वाघोली, चाकण मेट्रोचा निधी मंजूर करणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: विंडिजविरुद्ध PNG च्या सेसे बाऊचं विक्रमी अर्धशतक, तर रसेलचा IPL नंतर वर्ल्ड कपमध्येही गोलंदाजीत जलवा

Loksabha Election Result : भाजपचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या भेटीला; मतमोजणीसंदर्भात केल्या या 'चार' मागण्या

BJP President : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागताच भाजपचा अध्यक्ष बदलणार; 'या' तीन नावांची आहे चर्चा

Lok Sabha Election Result : सत्ता आल्यास पहिल्या १०० दिवसात काय करणार? लोकसभेच्या निकालापूर्वी PM मोदींची अधिकाऱ्यांसोबत खलबतं

Exit Poll Result: खरंच ४०० पार! देशात यापूर्वी झालं होतं शक्य; कसं अन् कधी वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT