baramati_sule.jpg
baramati_sule.jpg 
पुणे

Election Results : जनतेसमोर नतमस्तक : सुप्रिया सुळे

मिलिंद संगई

बारामती शहर : ''बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी माझ्यावर जो विश्वास् दाखविला, त्या विश्वासाबद्दल मी त्यांच्या समोर नतमस्तक आहे, आगामी पाच वर्षात देशात अव्वल लोकसभा मतदासंघ म्हणून बारामतीचा नावलौकीक अधिकाधिक वाढविण्याचा प्रयत्न मी करेन'', अशी प्रतिक्रिया बारामतीच्या नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.
 
त्या म्हणाल्या, पक्ष संघटनेतील प्रत्येक कार्यकर्त्याने केलेले काम व मतदारांनी दाखविलेला विश्वास या मुळेच हे यश मी मिळवू शकले. विकासाबाबतीत जसा गेल्या पाच वर्षात बारामती मतदारसंघ अव्वल आहे. तसाच आगामी काळातही तो राहिल असा माझा प्रयत्न असेल. पाणी, रेल्वे मंत्रालयासह इतरही विषयात विविध कामे मार्गी लावण्यासह हा मतदारसंघ कुपोषणमुक्त व अँनिमियामुक्त करण्यास प्राधान्य असेल. शिक्षणाला प्राधान्य देत माझ्या मनात जी स्वप्ने आहेत ती पूर्ण करण्यासाठी मी निश्चित काम करेन.  गेल्या वेळेस माझे काम सर्वांनीच पाहिलेले आहे, यंदा लोकांनी विश्वास टाकल्याने माझ्यावरची जबाबदारी वाढलेली असून ही जबाबदारी योग्य रितीने पार पाडण्याचा माझा प्रयत्न असेल.
 
इतके मताधिक्य मिळेल असे वाटले होते का, असे विचारता मी मताधिक्याचा कधीच विचार केला नव्हता, माझा मतदारसंघ व माझा मतदार यांच्याशी माझे भावनिक नाते आहे, जेवढा वेळ मी माझ्या कुटुंबाला देते त्याहून अधिक वेळ मी माझ्या जीवनात माझ्या मतदारसंघात घालवते, त्या मुळे हे वेगळे भावनिक नाते आहे. बारामती मतदारसंघ हे माझे कुटुंब आहे, त्या मुळे या कुटुंबाकडे मताधिक्याच्या दृष्टीकोनातून मी कधीच पाहत नाही व पाहणारही नाही, असे सुळे म्हणाल्या. आज माझी जी ओळख आहे, ती माझ्या मतदारसंघामुळे आहे, मला आज जी विश्वासार्हता आहे ती बारामतीमुळे आहे याचा विसर मला कधीच पडणार नाही. 

पार्थच्या पराभवाबाबत आत्मचिंतन करणार
पार्थ पवार यांचा पराभव आम्ही मान्य केला आहे, या पराभवाचे आत्मचिंतन आम्ही केलच पाहिजे, कशामुळे नेमका पराभव झाला, या मागची कारणे काय आहेत, ते आम्ही तपासून पाहणार आहोत, माझे पार्थशी या बाबत बोलणे झाले असून या बाबत पुढील दिशा आम्ही ठरवू, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Bidkin Crime News : धक्कादायक! भीशीचे व व्याजाचे पैसे न दिल्याने महिलेसह पाच मुलांचे अपहरण

Yuzvendra Chahal: ऋषभ पंतची विकेट चहलसाठी ठरली ऐतिहासिक! T20 मध्ये कोणत्याच भारतीयाला न जमलेला केला पराक्रम

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दुसऱ्याच चेंडूवर राजस्थानला मोठा धक्का! जैस्वालला ४ धावांवरच झाला आऊट

SCROLL FOR NEXT