Nana Patole
Nana Patole esakal
पुणे

Nana Patole : राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासाळली; नाना पटोले

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘राज्यात आमदारांवर, पत्रकारांवर, वकीलांवर हल्ले होत असून, जनता असुरक्षित असताना ५० खोके घेणाऱ्यांच्या सुरक्षेवर दिवसाला २० लाख रुपये खर्च केले जात आहेत. राज्यातील  कायदा आणि सुव्यवस्था ढासळलेली असून, राज्याचा व देशाचा कारभार हुकूमशाही पद्धतीने चालवला जात आहे. प्रशासकीय यंत्रणा चुकीच्या पद्धतीने वापरली जात आहे,’’ अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर केली.

काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषदेत पटोले बोलत होते. पटोले म्हणाले, ‘‘काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम आदानी यांचे काय संबंध आहे असा विचारलेला प्रश्‍न लोकसभेच्या कामकाजातून वगळण्यात आला. पण पंतप्रधानांना या सर्व प्रश्नाचे उत्तर देशवासीयांना द्यावीच लागतील.

देशातील बँका, एलआयसीमधील पैशाची लूट करण्यात आली आहे. यावर उपस्थित झालेल्या प्रश्‍नांची उत्तरे देण्याऐवजी पान टपरीवर चर्चेप्रमाणे मोदी संसदेत भाषण करत आहेत. काँग्रेसने अदानीला मोठे केले असा आरोप भाजप करत असले तरी आमच्या सत्ताकाळात अदानी कुठे होते आणि भाजपच्या आठ वर्षात कुठे पोहोचले याचे उत्तर भाजपने द्यावे.

भाजपच्या विरोधात जनतेच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात राग आहे. त्यामुळेच विधान परिषद निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आता कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीतही महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील. पोट निवडणुकीसाठी काँग्रेसचे केंद्रीय नेते येणार नाहीत, तर शरद पवार हेच आमचे नेते आहेत. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे पुणे आणि पिंपरी चिंचवडला प्रचारासाठी येणार आहेत, असे पटोले यांनी सांगितले.

नमस्काराची अपेक्षा ठेवू नका

‘‘ही पोटनिवडणूक आपण पक्ष म्हणून लढवत आहोत. उमेदवाराने मला नमस्कार करावा, आपल्याला विचारावे, अशी अपेक्षा ठेवू नका. आपण स्वतः: उमेदवार आहोत, असे समजून काम करा. ही निवडणूक आपली ताकद दाखवून राजकीय प्रवासाची सुरवात करण्याची चांगली चांगली संधी आहे, असा सल्ला पटोले यांनी कार्यकर्त्यांना बैठकीत दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT