Cyrus Poonawalla Sakal
पुणे

Cyrus Poonawalla : "शरद पवारांचे वय झाले, त्यांनी पंतप्रधानपदाची संधी दोनदा घालवली, आता त्यांनी थांबावे"; पवारांच्या वर्गमित्राचा सल्ला

पवारांच्या वर्गमित्रांनी थेट त्यांना राजकारणातून संन्यास घेण्याचा सल्ला दिला आहे.

दत्ता लवांडे

पुणे : "शरद पवार यांचे आता वय झाले आहे, त्यांच्याकडे दोन वेळा प्रधानमंत्री होऊन जनतेची सेवा करण्याची संधी होती पण ती त्यांना घालवली, आता त्यांनी थांबलं पाहिजे." असा थेट सल्ला शरद पवार यांचेच वर्गमित्र असलेले सायरस पूनावाला यांनी दिला आहे. ते पुण्यातील कोरेगाव पार्क येथे माध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले पूनावाला?

"शरद पवार यांचे वय झाले आहे. त्यांनी आता थांबलं पाहिजे. प्रधानमंत्री होऊन जनतेची सेवा करण्याची संधी त्यांनी दोन वेळा घालवली आहे. ते फार हुशार माणूस आहेत, ते चांगल्या पद्धतीने जनतेची सेवा करू शकले असते पण आता त्यांनी थांबायला पाहिजे" असं सायरस पूनावाला म्हणाले.

पवारांच्या निवृत्तीवरून राजकारण

शरद पवार यांच्या राजकारणातून निवृत्तीच्या प्रकरणानंतर राज्यातील राजकारणात झालेला गोंधळ आपल्याला माहितीच आहे. शरद पवार यांनी त्यांच्याच 'लोक माझे सांगाती' या आत्मकथेच्या नव्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये निवृत्तीची घोषणा केली होती.

त्यानंतर अनेक नेते आणि कार्यकर्ते यांना अश्रूचा बांध फुटला होता आणि त्यांनी निवृत्ती मागे घेण्याची मागणी केली होती. नेत्यांच्या आग्रहाखातर अखेर त्यांनी निवृत्ती मागे घेतली होती.

पण शरद पवार यांच्या वयावरून निवृत्तीच्या चर्चा राज्याच्या राजकारणात अनेकदा झाल्या आहेत. अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर त्यांच्या भाषणात अनेकदा, "शरद पवार यांचे वय झाले, आता तरी पुढच्या पिढीला संधी दिली पाहिजे, तुम्ही आता घरी बसलं पाहिजे." असा उल्लेख केला होता.

पण त्यानंतरच्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी "राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा शरद पवार हेच आहेत" असं ठणकावून सांगितलं आणि या वयातही आपण सक्षमपणे राजकारण करू शकतो हे दाखवून दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SEBI on Gold : सोन्याच्या दराबाबत सेबीचा मोठा निर्णय! 1 एप्रिलपासून लागू होणार नवीन नियम

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी राज ठाकरेंनी व्यक्त केला संशय; पत्रकार परिषद घेत म्हणाले...

Rare Vulture Sighting:लखाडमध्ये ‘जीपीएस’सह दुर्मिळ गिधाडाचे दर्शन; पेंच संरक्षण केंद्राशी नाळ जोडली!

Holi Holiday: मोठी बातमी! होळीपूर्वी पगार होणार; ३ दिवस सुट्टी मिळणार, कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Ambulance Accident: रुग्णवाहिकेची चाकेच निखळतात तेव्हा...,आरोग्य यंत्रणेचा कारभार चव्हाट्यावर; चालकाने जे केलं ते खतरनाक

SCROLL FOR NEXT