ncpbjp
ncpbjp 
पुणे

भाजप- राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ लेटर वाॅर रंगणार...

सकाळवृत्तसेवा

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याबद्दल संतप्त झालेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपराष्ट्रापती वेंकय्या नायडू यांना राज्यभरातून 20 लाख पत्र येत्या दोन- तीन दिवसांत पाठविणार आहे. 

नवनियुक्त सदस्यांना राज्यसभेत बुधवारी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू शपथ दिली. त्यावेळी शपथ घेताना उदयनराजे भोसले यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतले होते. नायडू यांनी त्याला आक्षेप घेतला. त्याच्या निषेधार्थ आता नायडू यांना पत्र पाठविण्याचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने ठरविले आहे. दरम्यान, राममंदिर बांधून कोरोना जाणार नाही, अशी टिपण्णी केल्याबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी राज्यातून दहा लाख पत्र पाठविण्याचे नियोजन भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाने केले आहे. त्याला ठोस प्रत्त्यूत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीने हे पाऊल आता उचलले आहे. त्यासाठी सोशल मीडिवरही कॅंपेनिंग करण्यात येणार आहे, अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली. 

राष्ट्रवादी काॅंग्रेसतर्फे सोशल मीडियावरही त्यासाठी तयारी करण्यात आली आहे. जिल्हा, तालुका आणि गावनिहाय त्यासाठी तयारी करण्यात येत आहे. त्यासाठी व्यापक संपर्क मोहीम हाती घेण्यात आली आहे, असे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसकडून सांगण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे आणि प्रत्यक्षात त्यांच्यावर आक्षेप घ्यायचा, हा भाजपचा दांभिकपणा आहे आणि तो उघड करण्यासाठी ही नायडू यांना पत्र पाठविण्याचे ठरले आहे, असे त्यांनी सांगितले.

पत्र पाठविण्याच्या प्रकारावरून येत्या चार दिवसांत भाजप आणि राष्ट्रवादीमधील कार्यकर्ते यांच्यात ऑनलाईनवर तुंबळ धुमश्चक्री होण्याची चिन्हे आहेत. गेल्या काही काळात राष्ट्रवादी काॅंग्रेसनेही सोशल मीडियावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठीचे सक्षम नेटवर्कही उभे केले आहे. त्यासाठी ट्विटर, फेसबुक, व्हॉटसअप, इन्स्ट्राग्राम आदींचाही वापर राष्ट्रवादी करीत आहे. 

पुणे शहरातून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते 51 हजार पत्र पाठविणार आहेत. गुरुवारी दिवसभरात किमान एक हजार पत्र नायडू यांना पाठविली जातील.                                                        - राकेश कामठे,  प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस 

  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : दिंडोरीत बंडखोरी, हरिश्चंद्र चव्हाण भरणार अपक्ष अर्ज

SCROLL FOR NEXT