पुणे

पुण्यातील प्राध्यापिका ‘सीबीआय’च्या जाळ्यात

CD

पुणे, ता. १६ : नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आणखी एका महिलेला दिल्लीत अटक केली आहे. नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या प्रक्रियेत ती तज्ज्ञ म्हणून सहभागी होती. यापूर्वी अटक झालेली ब्युटी पार्लर व्यावसायिक मनीषा वाघमारे हिच्या माध्यमातून तिने विद्यार्थ्यांना एकत्र करून विशेष शिकवणी वर्ग घेतल्याचे तपासात समोर आले आहे.
मनीषा गुरुनाथ मांढरे असे अटक केलेल्या प्राध्यापक महिलेचे नाव आहे. पांढरे ही येथील एका नामांकित महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. तिला चौकशीसाठी दिल्लीत बोलवले होते. त्यानंतर चौकशीतून समोर आलेल्या तपासाच्या आधारे तिला अटक केली आहे. शिकवणी वर्गात शिकविलेले अनेक प्रश्‍न प्रत्यक्ष नीट परीक्षेच्या प्रश्‍नपत्रिकेशी जुळल्याचे ‘सीबीआय’ने स्पष्ट केले आहे.
‘सीबीआय’ने केलेल्या चौकशीनुसार, राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून (एनटीए) मांढरे हिची तज्ज्ञ म्हणून नियुक्ती केली होती. तिला वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र विषयांच्या प्रश्‍नपत्रिकांची माहिती होती. एप्रिल २०२६ दरम्यान तिने वाघमारे हिच्या माध्यमातून काही संभाव्य विद्यार्थ्यांना संपर्क साधून पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी विशेष शिकवणी वर्ग घेतले होते. त्यात वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र विषयांतील प्रश्‍न विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. तसेच, ते प्रश्‍न वहीत लिहून घेण्यास आणि पाठ्यपुस्तकांमध्ये खुणा करण्यास सांगितल्याचे तपासात उघड झाले आहे. यातील बहुतांश प्रश्‍न तीन मे रोजी झालेल्या नीट-यूजी परीक्षेतील प्रत्यक्ष प्रश्‍नपत्रिकेशी जुळल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणात यापूर्वी बिबवेवाडी परिसरात ब्युटी पार्लर चालविणाऱ्या मनीषा वाघमारे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथील धनंजय लोखंडे यांना अटक केली होती. लोखंडेच्या संपर्कातून पुणे कनेक्शन समोर आल्यानंतर ‘सीबीआय’ने तपासाची सूत्रे वेगाने हलविली होती. पुण्यातील अभियांत्रिकी शाखेतील एका विद्यार्थ्यालाही चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र, चौकशीनंतर त्याला सोडून दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सहा ठिकाणी शोधमोहीम :
गेल्या २४ तासांत ‘सीबीआय’ने देशभरातील सहा ठिकाणी शोधमोहीम राबवून गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रे, लॅपटॉप, बँक स्टेटमेंट आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. जप्त साहित्याचे सविस्तर विश्‍लेषण सुरू असल्याचे ‘सीबीआय’ने सांगितले.

आतापर्यंत नऊ जणांना अटक :
या गुन्ह्यात आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर येथून एकूण नऊ आरोपींना अटक केली आहे. त्यापैकी पाच आरोपींना न्यायालयात हजर केले असून, सखोल चौकशीसाठी सात दिवसांची ‘सीबीआय’ कोठडी सुनावली आहे. गुरुवारी अटक केलेल्या दोन आरोपींना पुणे न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांड घेतली असून, त्यानंतर त्यांना पुढील कारवाईसाठी दिल्लीला हजर केले आहे.

निवृत्तीच्या उंबरठ्यावर कारवाई :
मांढरे ही गेल्या २४ वर्षांपासून वनस्पतीशास्त्र विषयाचे अध्यापन करत आहे. त्या पुढील आठ ते दहा महिन्यांत सेवानिवृत्त होणार होत्या. मात्र, त्यापूर्वीच नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणातील त्यांच्या कथित सहभागाचा उलगडा झाल्याने त्या ‘सीबीआय’च्या कचाट्यात सापडल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divya Mittal IAS Resignation : आयएएस पदाचा राजीनामा, आता राजकारणात एंट्री; दिव्या मित्तल यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

Pune Mega Plan : पुण्याचा २०३६ चा मेगा प्लॅन विकास आराखडा तयार : अर्थव्यवस्था २२० अब्ज डॉलर करण्याचे उद्दिष्ट

Solapur Farmer Loan Waiver : 59 हजार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा; त्रुटी दूर, नवीन यादी लवकरच होणार जाहीर, आतापर्यंत 30 हजार 500 शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध

Marathi News Live Updates: ९० कोटींच्या रस्ता निविदेवरून आमदाराचा महापालिका आयुक्तांना धमकीचा आरोप; ठेकेदाराच्या पात्रतेवरून नेमका काय घडला वाद?

Election Symbol Controversy : निवडणूक आयोग एखाद्या पक्षाच्या सांगण्यावरून काम करत असेल तर आता काय उरते?; हायकोर्टाचा सवाल

SCROLL FOR NEXT