Imtiyaj Momin
Imtiyaj Momin Sakal
पुणे

बदलत्या शिक्षणामध्ये डिजिटल शिक्षण काळाची गरज - इम्तियाज मोमीन

मोहिनी मोहिते

शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूलमंत्राची आठवण भाजप हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष इम्तियाज मोमीन यांनी करून दिली.

कॅन्टोन्मेंट - शिक्षण (Education) प्रवाहामध्ये अनेक बदल (Changes) होत आहेत, त्यामुळे आज डिजिटल शिक्षण (Digital Education) ही काळाची गरज (Need) आहे. विद्यार्थ्यांनी (Students) गुणवंत होण्याबरोबर ज्ञानवंत झाले पाहिजे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूलमंत्राची आठवण भाजप हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष इम्तियाज मोमीन (Imtiaz Momin) यांनी करून दिली.

वैदूवाडीतील महापालिकेच्या नर्मदाबाई कांबळे विद्यालयामध्ये नानासाहेब परुळेकर सकाळ चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मराठी डिजि माध्यम उपक्रमाची सुरुवात मोमीन यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी भाजपचे संदीप दळवी, अकिल शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

संदीप दळवी म्हणाले की, कोरोना कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यात आले. त्याला प्रोत्साहन देण्यासाठी सकाळने सुरू केलेल्या मराठी डिजि माध्यमाचा विद्यार्थ्यांना चांगला फायदा होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

भाजपाचे हडपसर वि. स. म. संघाचे भाजपा संदिप दळवी, संघटन सचिव गणेश घुले, आरपीआय नेते उद्धव चिलवंत, आरपीआय नेते यादव हारणे, प्रकल्प प्रमुख हेमंत वंदेकर, मार्केटिंग मॅनेजर हेमंत छत्रे, कॉर्पोरेट मॅनेजर अपूर्व गुजराथी, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पारधे, अकबर सय्यद आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

IPL 2024 LSG vs RR Live Score : खराब सुरूवातीनंतर लखनौनं डाव सावरला; राहुलची आक्रमक फलंदाजी

DC vs MI, IPL 2024: डेव्हिडचा कडक षटकार, मात्र संपूर्ण स्टेडियम हळहळलं; पाहा कोण जखमी झालं?

Hardik Pandya DC vs MI : सतत हसत असणाऱ्या पांड्या दिल्लीविरूद्ध मात्र जाम भडकला; Video व्हायरल

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

SCROLL FOR NEXT