दोन विद्यार्थ्यांचा रोखलेला
निकाल घोषित करण्याचे निर्देश
छत्रपती संभाजीनगर, ता. ११ : ‘नीट’ फेरपरीक्षेचा निकाल रोखण्यात आलेल्या दोन विद्यार्थ्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मोठा दिलासा दिला आहे. त्यांचे निकाल जाहीर करण्याचे निर्देश राष्ट्रीय परीक्षा संस्थेला (एनटीए) दिले आहेत. न्या. नितीन सूर्यवंशी आणि न्या. आबासाहेब शिंदे यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले.
याप्रकरणी दोन विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ‘नीट’ परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) सुरू असल्याने या दोन्ही विद्यार्थ्यांचे निकाल रोखण्यात आले होते. सुनावणीदरम्यान सीबीआयच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले, की दोन्ही विद्यार्थ्यांची नावे तपासाशी संबंधित यादीत आहेत. मात्र, २८ जुलैला दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात त्यांना आरोपी करण्यात आलेले नसून साक्षीदार म्हणून नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचा निकाल जाहीर करण्यास सीबीआयची कोणतीही हरकत नसल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.