student.jpg
student.jpg 
पुणे

पुणे : 'नेट'च्या परीक्षेबाबत मोठा निर्णय; वाचा सविस्तर

सकाळवृत्तसेवा

पुणे : राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (एनटीए) 
सहायक प्राध्यापकांसाठी अनिवार्य असलेली 'राष्ट्रीय पात्रता परीक्षे'साठी (नेट) अर्ज करण्याची मुदत १५ जूनपर्यंत वाढवली आहे. ही परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार १५ ते २० जून दरम्यान होणार होती. मात्र आता अर्ज स्विकारण्याची मदत वाढल्याने 'नेट'ची परीक्षा लांबणीवर पडणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

"एनटीए'मार्फत नेट परीक्षा देशभरात घेतली जाते. 'यूजीसी नेट' परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी ३१ मे पर्यंत मुदत होती. मात्र लॉकडाउनमुळे विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास अडचणी येत्या होत्या. तसेच देशाच्या अनेक भागात 'कोरोना'चे रुग्ण आढळून येत असल्याने परीक्षेसाठी पोषक वातावरण नाही, त्यामुळे अर्ज करण्यास मुदतवाढ मिळावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी होत होती. त्यानुसार 'एनटीए'ने निर्णय घेतला आहे.

'यूजीसी नेट'सह 'सीएसआरआय-यूजीसी नेट', इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्‍त विद्यापीठाची 'पीएचडी', 'एमबीए' प्रवेश परीक्षेसाठी आणि इंडियन कौन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रीसर्च परीक्षेसाठी १५ जून पर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ दिली आहे.

"एनटीए'ने नेट परीक्षा जून महिन्यात घेण्याचे नियोजन केले होते. आता अर्जासाठी कालावधी वाढविण्यात आल्याने जून महिन्यात परीक्षा होणे कठीण आहे. त्यामुळे नेट परीक्षेची तारीख पुढे ढकलावी लागणार आहे. नेट परीक्षेची सुधारित तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: PM मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अॅक्शन मोडवर

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT