विशेषाधिकार समितीमध्ये
खासदार बारणे आणि सावंत
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. ३ ः लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदनाच्या नव्या विशेषाधिकार समितीची स्थापना केली असून शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांचा या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. भाजपचे ज्येष्ठ खासदार रविशंकर प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करेल.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात विशेषाधिकार समितीचा मुद्दा उपस्थित झाला होता. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात विशेषाधिकार उल्लंघनाची नोटीस दिली जाणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले होते. मात्र ही समितीच अस्तित्वात नसल्याने नोटीस कशी देणार, असा सवाल विरोधी पक्षांनी विचारला होता. या पार्श्वभूमीवर समितीची स्थापना केली जात आहे हे विशेष.
या सदस्यांचाही समावेश
पंधरा खासदारांच्या या समितीत काँग्रेसच्या तारिक अन्वर, मनीष तिवारी, तृणमूलच्या कल्याण बॅनर्जी, भाजपच्या जगदंबिका पाल, ब्रिजमोहन अग्रवाल, रामवीर सिंह बिधुडी, द्रमुकच्या टी. आर. बालू, ‘सप’च्या धर्मेंद्र यादव आदी नेत्यांना संधी देण्यात आली आहे. समितीमध्ये भाजपचे सात तर काँग्रेसचे तीन खासदार सहभागी आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.