New Year 2023 Welcome new year enthusiasm action will taken if rules broken Forest Department appealed maintain sanctity of fort
New Year 2023 Welcome new year enthusiasm action will taken if rules broken Forest Department appealed maintain sanctity of fort sakal
पुणे

New Year 2023 : नववर्षाचे स्वागत उत्साहात करा पण नियम मोडल्यास कारवाई होणार...

निलेश बोरुडे

सिंहगड : नववर्षाचे स्वागत सर्व नागरिकांनी उत्साहात करावे, परंतु अतिउत्सात शासनाने ठरवून दिलेले नियम किंवा कायदे मोडल्यास कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली आहे.

तसेच जिल्ह्यातील गडकिल्ल्यांचे पावित्र्य राखावे व वन विभागाच्या हद्दीत असलेल्या पर्यटन स्थळांवर हुल्लडबाजी करु नये असे आवाहन उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी नागरिक व पर्यटकांना केले आहे.

नववर्षाच्या स्वागतासाठी खडकवासला, पानशेत, वरसगाव, पवना, भाटघर,गुंजवणी व इतर धरणे, हवेली, वेल्हे , भोर, मावळ,मुळशी, पुरंदर, जुन्नर या तालुक्यांतील गडकिल्ले, पर्यटनस्थळे, फार्महाऊस, रिसॉर्ट व हॉटेल्सवर पुणे शहर व जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात येतात.

महाविद्यालयीन तरुण-तरुणी व वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्यांबरोबरच उद्योजक, व्यावसायिक मोठ्या पार्ट्यांचे आयोजन करतात. अनेक अतिउत्साही तरुण-तरुणी, नागरिक किंवा पर्यटक अशावेळी मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन करतात.

मद्यप्राशन केल्यानंतर रस्त्यावर हैदोस घालणे, मोठमोठ्याने आरडाओरड करणे, बेदरकारपणे वाहणे चालवणे, मोठ्या आवाजात गाणे वाजवणे असे गैरप्रकार होताना दिसतात. परिणामी याचा इतर नागरिकांना त्रास सहन करावा लागतो व पर्यावरणाचीही हानी होते.

तसेच शांततेचा भंग होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. या सर्व गोष्टींना प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने पूर्वतयारी केली असून नियम मोडणारांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली आहे.

पोलीस प्रशासनाचे नियोजन

•हद्दीतील हॉटेल, फार्महाऊस व रिसॉर्ट मालकांची बैठक घेऊन नियम पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

•गैरप्रकार आढळून आल्यास हॉटेल मालकांवरही कारवाई होणार.

•महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी असणार.

•मद्यप्राशन करुन वाहन चालवताना आढळून आल्यास दंडात्मक कारवाई व मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल होणार.

•पोलीसांचे गस्ती पथक तैनात असणार.

•पर्यटनस्थळांच्या परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात असणार.

•गैरप्रकार आढळून आल्यास ११२ नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन.

"नववर्षाच्या स्वागतादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे ग्रामीण पोलीस प्रशासनाने काटेकोर नियोजन केलेले आहे. ज्या भागात पर्यटक किंवा नागरिक मोठ्या प्रमाणात नववर्षाच्या स्वागतासाठी जातात त्या भागात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

कायद्याचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्याच्या सूचना सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. नागरिकांनीही अतिउत्साहात किंवा नशेच्या आहारी जाऊन कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी."

अंकित गोयल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण.

"वन विभागाच्या देखरेखीखाली व हद्दीत असलेले गडकिल्ले आणि इतर पर्यटन स्थळांवर जे नियम लागू आहेत त्याचे पालन सर्वांनी करावे. गडकिल्ल्यांचे पावित्र्य भंग होणार नाही याची खबरदारी घेऊन नववर्षाचे स्वागत करावे. कोठेही गैरप्रकार आढळून आल्यास वन विभागाकडून अशा उपद्रवी पर्यटकांवर कारवाई करण्यात येईल."

राहुल पाटील, उपवनसंरक्षक, पुणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT