jayashree
jayashree 
पुणे

नवविवाहितेचा मंडपातच झाला मृत्यू...

युनूस तांबोळी

टाकळी हाजी (शिरूर, पुणे): कलवऱ्यांनी हसत खेळत अंगाला हळद लावली, मंडवळ्या, बांशीग बांधून विवाहासाठी सजवले, शुभमंगल सावधान... म्हणत वऱ्हाडी मंडळीनी अक्षता टाकल्या, वरासोबत सप्तपदी घेत उखाण्यात नावे घेत मिठाईचे घास भरविले. या मंगलमय क्षणाच्या आठवणी कॅमेऱ्यात कैद झाल्या. पण... परमेश्वरला हे काही वेगळेच मंजूर होते. मंडपातच अचानक आलेल्या ताप व चक्करने या नववधूचा मृत्यू झाल्याने विवाहाचे स्थळ शोकाअवस्थेत बुडाले. टाकळी हाजी (ता. शिरूर) म्हसे येथे घडलेली घटना आहे.

जयश्री शिवनिगप्पा कळस गौंडा (वय 19) असे या नवविवाहितेचे नाव आहे. या बाबत मिळालेली माहिती अशी की, म्हसे येथील सोसायटीचे माजी अध्यक्ष बबन रभाजी मुसळे यांच्या हिरामन व दिंगबर या दोन मुलांचा विवाह सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट येथील सख्या मावस बहिणी जयश्री शिवनिगप्पा कळस गौंडा व विजयालक्ष्मी धर्मन्ना भंगर्गी या वधूंशी ठरला होता. रविवारी (ता. 6) दुपारी हा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. वरमाला घालून सप्तपदी घेऊन या विवाहितांनी ऐकमेकांना पुढील आयुष्याचे जीवन साथी म्हणून मान्य केले होते. हिरामन या वराचा जयश्री या वधुशी विवाह झाला. लग्ना नंतरची सुखी संसाराची स्वप्न पहात या वधुवरांनी ऐकमेकांना मिठाई खाऊ घातली. या सुखद कार्यक्रमाचे छायाचित्रण करण्यात आले. त्यानंतर अक्कलकोट वरून आलेले आई वडील व पाहुणे आनंदाने परतीच्या प्रवासासाठी निघाले. तेवढ्यात जयश्रीला ताप व चक्कर येऊन त्रास होऊ लागला. त्यानंतर मुसळे यांनी तातडीने नववधू जयश्री हिला शिरूर येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी आणले. उपचारा पुर्वी तिची प्राणज्योत मालवली होती. काही वेळा पुर्वी आयुष्याची जीवनसंगीमी म्हणून एकमेकांनी हातात हात घातला होता. सुखी संसाराची स्वप्न रंगवली होती. अशा या नववर हिरामन चे स्वप्न भंगले.

मंगलमय ते नंतर शोकाकूलता...
विवाह जुळणे ते विवाह पार पाडेपर्यंत हे वधुच्या आईवडीलांची तारेवरची कसरत असते. त्यातून योग्य मुली मिळणे अतीशय कठीण परीस्थीती असते. योगायोगाने विवाह जुळवून आला. विवाहात कोणतेच विघ्न आले नसल्याने ते आनंदाने पार पडले. मुलीची बिदाई करून दिल्या घरी सुखी रहा चा आर्शीवाद दिला खरा...पण तो असफल ठरला. रात्री उशीरा शवविच्छेदन करून कळस गौंडा यांनी जयश्री ला रूग्णवाहिकेमधून सोलापूरला नेले त्यावेळी उपस्थितांचे डोळे पाण्याने डबडबले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: मागील १० वर्षांमध्ये मोठ्या बाता मारण्यात आल्या. परंतु, तुमच्या आयुष्यात काहीच बदल झाला नाही - प्रियांका गांधी

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT