nia arrests anaesthesiologist adnan ali sarkar pune maharashtra isis terror module Sakal
पुणे

Pune Crime : अदनान अली आणि दहशतवाद्यांच्या ‘कनेक्शन’बाबत तपास!

एनआयएच्या अधिकाऱ्यांनी कोंढवा परिसरातून डॉ. अदनान अली सरकार याला गुरुवारी अटक

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केलेल्या डॉ. अदनान अली सरकार आणि पुण्यात नुकत्याच अटक केलेल्या दहशतवाद्यांचे काही ‘कनेक्शन’ आहे का, याबाबत गुप्तचर यंत्रणांकडून तपास करण्यात येत आहे.

एनआयएच्या अधिकाऱ्यांनी कोंढवा परिसरातून डॉ. अदनान अली सरकार याला गुरुवारी अटक केली होती. त्याच्या कोंढव्यातील घराच्या झडतीत इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि इसिसशी संबंधित दस्तऐवज आढळून आले आहेत.

एनआयएच्या म्हणण्यानुसार, अदनान अली हा काही तरुणांचे ‘ब्रेन वॉश’ करून त्यांची इसिस संघटनेत भरती करीत होता. अदनान अली याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

या घटनेच्या काही दिवसांपूर्वीच पुणे पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यांच्या कोंढव्यातील घरातून देश विघातक कृत्याशी संबंधित दस्तावेज आणि स्फोटक पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

या दोघांचा इसिसच्या अल सुफा या संघटनेशी संबंध असल्याचे समोर आले आहे. या घटनांवरून त्यांच्यात काही संबंध आहेत का, हे तपासण्यात येत आहे. तसेच, दहशतवाद्यांना मदत पुरविणाऱ्या ‘स्लीपर सेल’वरही तपास यंत्रणांचे बारीक लक्ष असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

अदनान अलीवर होता एटीएसचाही ‘वॉच’-

डॉ. अदनान अली याच्यावर पुणे दहशतवादी विरोधी पथकाचा (एटीएस) ‘वॉच’ होता. काही महिन्यांपूर्वी त्याच्यावर कारवाई करण्याबाबत राज्य दहशतवादी विरोधी पथकाकडे अहवालही पाठविण्यात आला होता, अशी माहिती समोर आली आहे.

पुणे शहर पुन्हा दहशतवाद्यांच्या रडारवर !

पुणे शहरात यापूर्वी जर्मन बेकरी, फरासखाना पोलिस ठाण्याच्या आवारात आणि जंगली महाराज रस्त्यावर बॉम्बस्फोटाच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, संरक्षण संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेतील (डीआरडीओ) शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर याला पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून नुकतीच अटक करण्यात आली.

पुणे पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना आणि त्यानंतर एनआयएने अदनान अली याला पुण्यात अटक केली. या घटनांवरून पुणे शहर पुन्हा दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलिस आणि गुप्तचर यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Latest Marathi News Updates : मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

Jabrat Poster: मैत्रीचा गोडवा सांगणारा ‘जब्राट’; पोस्टर लाँच, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली

Shivaji Maharaj: मुंबई पोलिसांच्या लाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा

SCROLL FOR NEXT