पुणे

निदा खानची ‘एसआयटी’कडून ‘मॅरेथॉन’ चौकशी

CD

निदा खानची ‘मॅरेथॉन’ चौकशी
टीसीएस लैंगिक शोषण प्रकरण : कुटुंबीयांच्या चौकशीतून तपासाला वेग
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ८ : बहुराष्ट्रीय टीसीएस कंपनीतील पीडितेच्या लैंगिक अत्याचार व धर्मांतरांचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात दीड महिन्यांपासून फरार संशयित निदा खानची विशेष तपास पथकाने (एसआयटी) तब्बल पाच ते साडेपाच तास ‘मॅरेथॉन’ चौकशी केली. तर, निदाची आई-वडील व भावांचीही चौकशी केली. या प्रकरणात निदाची भूमिका महत्त्वाची असून, चौकशीतून तपासाला वेग आला आहे.
टीसीएस कंपनीतील अत्याचार व धर्मांतरप्रकरणी २५ मार्चला गुन्हा दाखल होताच, संशयित निदा खान फरार झाली होती. गेल्या दीड महिन्यांपासून एसआयटी तिच्या मागावर होते परंतु ती पथकाच्या हाती लागली नाही. अखेर गुरुवारी रात्री एसआयटी व छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून एमआयएमचे नगरसेवक मतिन पटेल यांच्या फ्लॅटमधून अटक केली. निदा खान तिचे आई-वडील व भावांसह त्याठिकाणी राहत होती. मध्यरात्री नाशिकला आणण्यात आले. शुक्रवारी देवळाली कॅम्प पोलिसात हजर केले असता, तिला सोमवारपर्यंत (ता. ११) पोलिस कोठडी सुनावली आहे.
एसआयटीचे प्रमुख व शहर गुन्हेशाखेचे सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या उपस्थितीमध्ये निदा खान हिची शनिवारी तब्बल पाच ते साडेपाच तास कसून चौकशी करण्यात आली. निदा खान हिने पीडितेला तिच्या हिंदू धर्मांविषयी अवमानास्पद शेरेबाजी केली होती. तसेच, पीडितेला बुरखा परिधान करण्याबाबतची माहिती देत तिनेच मुस्लिम धर्मांची पुस्तके, रिल्स, डिजीटल माहिती पुरविली आणि तिचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. याचप्रकरणी एसआयटीकडून तिची कसून चौकशी करण्यात आली. संशयित दानिश, शाहरुख व रझा मेनन यांच्याशी ती संपर्कात होती. त्यांच्यातील सोशल मीडियावरील चॅटींग एसआयटीच्या हाती लागले आहेत. यामुळे पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागले असून, तपासाला वेग आला आहे.
कुटुंबीयांचीही चौकशी
छत्रपती संभाजीनगर येथे निदा खान ही तिचे आई-वडील व दोन भावांसह गेल्या काही दिवसांपासून राहत होती. निदा खान हिची चौकशी सुरू असतानाच, तिचे आई-वडील व दोन्ही भावांचीही सुमारे दोन तास कसून चौकशी करण्यात आली. प्रारंभी स्वतंत्र चौकशी केल्यानंतर सर्वांची समोरासमोरही चौकशी करण्यात आली.
मतिन पटेलची चौकशी होणार
दरम्यान, निदा खान प्रकरणात एमआयएमचे संभाजीनगरचे नगरसेवक मतिन पटेल यांचा सहभाग निष्पन्न झाला आहे. गुन्ह्यातील फरार असलेल्या निदा खानला पटेल यांनी आसरा दिला, तसेच तिची माहिती लपवून ठेवली. त्यामुळे याप्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पटेल यांचीही एसआयटीकडून चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT