पत्रकार भवन, गांजवे  चौक - राम नगरकर कला अकादमीतर्फे देण्यात येणारा राम नगरकर कलागौरव पुरस्कार डॉ. नीलेश साबळे यांना प्रदान करण्यात आला. या वेळी (डावीकडून) विनोद सातव, वंदन नगरकर, साबळे, सुधीर गाडगीळ, प्रवीण तरडे.
पत्रकार भवन, गांजवे चौक - राम नगरकर कला अकादमीतर्फे देण्यात येणारा राम नगरकर कलागौरव पुरस्कार डॉ. नीलेश साबळे यांना प्रदान करण्यात आला. या वेळी (डावीकडून) विनोद सातव, वंदन नगरकर, साबळे, सुधीर गाडगीळ, प्रवीण तरडे. 
पुणे

निरागस विनोद रसिकांना भावतो - साबळे

सकाळ वृत्तसेवा

पुणे - तंत्रज्ञानाचा अभाव आणि कृष्ण धवल चित्र ज्या काळात होते, त्या काळात राम नगरकरांसारख्या एकपात्री कलाकाराने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवले. कारण त्यांचा विनोद हा निरागस होता आणि असाच विनोद रसिकांना भावतो, असे मत लेखक, दिग्दर्शक आणि विनोदी अभिनेता डॉ. नीलेश साबळे यांनी व्यक्त केले.

राम नगरकर कला अकादमीतर्फे देण्यात येणारा राम नगरकर कलागौरव पुरस्कार अभिनेता डॉ. साबळे यांना निवेदक सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी साबळे बोलत होते. या वेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि लिड मीडियाचे संस्थापक अध्यक्ष विनोद सातव, तसेच राम नगरकर कला अकादमी पुणे शाखेचे अध्यक्ष वंदन नगरकर उपस्थित होते. डॉ. साबळे म्हणाले, ‘‘रंगमंचावर वावरण्यासाठी एकपात्री हे माध्यम मी निवडले, त्या वेळी या क्षेत्रात नावाजलेल्या व्यक्तींचा अभ्यास करू लागलो. त्यात राम नगरकरांचे स्थान प्रामुख्याने प्रथम स्थानावर येते. नगरकरांचे लेखन जणू माझ्यासाठीच होते, अशा पद्धतीने मी गावोगावी त्याचे एकपात्री प्रयोग करू लागलो.’’ गाडगीळ म्हणाले, ‘‘इतक्‍या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात कलेच्या क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करणे सहज सोपे नाही.

साबळे यांच्यामध्ये असलेल्या गुणवत्तेमुळेच त्यांना हे शक्‍य झाले आहे. नव्या पिढीतील सर्वोत्तम विनोदी कलाकार म्हणून त्यांचा उल्लेख केल्यास अतिशयोक्ती होणार नाही.’’ तरडे यांनी डॉ. साबळे यांच्याबरोबर सुरवातीच्या काळात मुंबईत एकाच खोलीत राहत असतानाच्या आठवणींना उजाळा दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Ganesh Naik: आम्हाला प्रेमाने दिलेला आदेश आवडतो, तंबी देणारा जन्मलेला नाही

IPL 2024 LSG vs KKR : ४८ तासांच्या आत कोलकता पुन्हा मैदानात! लखनौ सुपर जायंटस् विरुद्ध आज सामना

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांची सांगता सभा

SCROLL FOR NEXT