पुणे

एन.आय.पी.एम.साताराचे नवीन कामगार संहितावर व्याख्यान

CD

एनआयपीएम सह्याद्री सातारा चॅप्टरच्या कार्यक्रमास प्रतिसाद

सातारा, ता. १२ ः राष्ट्रीय स्तरावर मानव संसाधन क्षेत्रात कार्यरत असलेल्या एनआयपीएम संस्थेच्या सातारा सह्याद्री चॅप्टर कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमास मासचे अध्यक्ष धैर्यशील भोसले, सहाय्यक कामगार आयुक्त नितीन कावले, संयुक्त संचालक इरफान खान, एनआयपीएम सह्याद्री सातारा चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. उदय भोसले, उपाध्यक्ष नितीन देशपांडे उपस्थित होते. या कार्यक्रमात अ‍ॅड. डॉ. श्रीकांत मालेगावकर यांनी नवीन कामगार संहिता या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
डॉ. उदय भोसले यांनी एनआयपीएम संस्थेचे उद्दिष्ट व कार्यप्रणालीची माहिती दिली, तसेच श्री. देशपांडे यांनी सह्याद्री सातारा चॅप्टरच्या कार्याचा आढावा घेतला, तसेच जास्तीतजास्त मानव संसाधन (एचआर) क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी एनआयपीएम सह्याद्री सातारा चॅप्टरचे सभासदत्व घ्यावे, याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास कूपर, विप्रो पारी, डेलवाल, अविनाश कार्गो, श्रीएचआर सर्व्हिसेस, कोपलॅन्ड, कमिन्स, निप्रो, परांजपे, सुदर्शन केमिकल्स, युमीकोअर, युपीस लॉजिस्टिक्स, वेलस्पन व सातारा जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रातील १५० पेक्षा जास्त प्रतिनिधींनी भाग घेतला. एनआयपीएम नॅशनल कॉन्सिल मेंबर अभय खुरसाळे, धैर्यशील देसाई, उद्योजक राजेंद्र मोहिते, संजोग मोहिते, डॉ. बी. एस. सावंत, तसेच डॉ. भोला, डॉ. निकम, डॉ. चव्हाण, शंकर साळुंखे, अनिल वासू, विविध उद्योग संस्थांचे प्रतिनिधी, कार्यक्रमाचे प्रायोजक राजवर्धन इन्फ्रा व श्री शिवम ग्रुपचे प्रतिनिधी व इतर मान्यवर उपस्थित होते.

----
18502
सातारा ः दीपप्रज्वलन करताना धैर्यशील भोसले, डॉ. श्रीकांत मालेगावकर, डॉ. उदय भोसले, नितीन देशपांडे, महेश खरे आदी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasba Ganpati in Texas: अमेरिकेत दुमदुमला कसबा गणपतीचा जयघोष ; ह्यूस्टन महाराष्ट्र मंडळाकडून पुण्याच्या ग्रामदैवताची प्रतिष्ठापना

Viral Video : विमान हवेत असताना दोन प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latur Crop Loss: निलंगा तालुक्यात खरीप पीक शंभर टक्के उद्ध्वस्त; कृषी विभागाच्या ‘७० टक्के’ अहवालावर शेतकऱ्यांचा संताप

Sahyadri Sugar Mill: सह्याद्री साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; घोषणाबाजी, गदारोळ आणि तणावपूर्ण वातावरण

Malegaon Tractor Attack Case: माळेगावात ट्रॅक्टरने जीवे मारण्याचा प्रयत्न; नरूटे कुटुंबीयांवर हल्ला, पाच जणांविरुद्ध गुन्हा

SCROLL FOR NEXT