Nira-Deoghar Dam water discharge issue alert to nearby villages monsoon weather Sakal
पुणे

Nira-Deoghar Dam : नीरा देवघर धरणाच्या सांडव्यातून विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

नीरा देवघर धरण (ता.भोर) पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कायम असल्याने नीरा देवघर धरण बुधवारी (ता.३१ जुलै) संध्याकाळी ६ वाजता ८९.८६ टक्के भरले. त्यामुळे विद्युतगृहद्वारे नदी पात्रामध्ये ७५० क्यूसेकने विसर्ग सुरु करण्यात आला होता.

सकाळ वृत्तसेवा

- विलास मादगुडे

भोर : नीरा देवघर धरण (ता.भोर) पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कायम असल्याने नीरा देवघर धरण बुधवारी (ता.३१ जुलै) संध्याकाळी ६ वाजता ८९.८६ टक्के भरले. त्यामुळे विद्युतगृहद्वारे नदी पात्रामध्ये ७५० क्यूसेकने विसर्ग सुरु करण्यात आला होता.

परंतु, धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू नव्हता. मागील दोन दिवसात पावसाचे प्रमाण वाढल्याने धरणामध्ये सुरु असणाऱ्या येव्याचे प्रमाण लक्षात घेता आज शुक्रवारी (ता. २ ऑगस्ट) सकाळी ८ वाजता धरण ९४ टक्के भरल्याने सकाळी ९ वाजता धरणाच्या सांडव्यावरून नदी पात्रामध्ये २ हजार ६५३ क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. सांडव्याच्या तीन दवाज्यातून विसर्ग सोडण्यात आला आहे. विद्युतगृहाद्वारे ७५० क्यूसेक व सांडव्यातून २ हजार ६५३ असे एकूण ३ हजार ४०३ क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.

धरणातून पाण्याच्या विसर्गात वाढ केल्याने नीरा नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोणीही नदीपात्रात उतरू नये, बांधकाम साहित्य व कामगार यांना सुरक्षीत स्थळी हालवावे, नदीपात्रात पिण्याच्या पाण्याचे व शेतीपंप असेल तर तेही सुरक्षीत ठिकाणी हलविण्यात यावेत तसेच सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घेण्याचे आवाहन पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दि.ग.डुबल यांनी यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Amal Mahadik Meet : अमल महाडिक मला वारंवार भेटतात पण, मुश्रीफ भेटत नाहीत; सतेज पाटलांनी गोकुळ, केडीसीसीतील इनसाईड स्टोरीच सांगितली

Gold Rate Today: सोन्यावर ट्रम्प इफेक्ट! एका दिवसात मोठा उलटफेर! जाणून घ्या आजचे ताजे भाव

Monsoon El Nino Impact India : यंदा एल निनोचा इशारा, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये मॉन्सूनचा पाऊस कमी, हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज

Thalapathy Vijay: बहुमतापासून १० आमदार दूर; काँग्रेसच्या ५ जागांवर TVK चा खेळ कसा फिरणार? सत्ता स्थापनेची समीकरणे कशी बदलणार

Congress Muslim Candidates Success : काँग्रेसच्या विजयी उमेदवारांत मुस्लिम सर्वाधिक; आसाम ते केरळपर्यंत 'मुस्लिम' उमेदवारांचाच स्ट्राइक रेट जबरदस्त!

SCROLL FOR NEXT