nira devghar dam sakal
पुणे

Dam News : नीरा-देवघर धरण १०० टक्के भरले

Dam News : धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यास धरणाच्या सांडव्याचे दरवाजे उघडण्यात येणार

सकाळ डिजिटल टीम

Dam News : भोर तालुक्यातील नीरा-देवघर धरण १०० टक्के भरले असून धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रातून ७५० क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे २ ऑगष्टला नीरा-देवघर धरणात ९० टक्के पाणीसाठा झाला होता.

त्यावेळी वीजनिर्मिती केंद्र सुरु करण्यात आले. वीजनिर्मिती केंद्रातून ७५० क्यूसेक्सने पाणी सोडल्याने दररोज ६ मेगाव्हॅट वीजनिर्मिती सुरु करण्यात आली. मात्र पाऊसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत पुरेसी वाढ होत नव्हती.

त्यामुळे ८ ऑगष्टला वीजनिर्मिती केंद्रातून पाण्याचा विसर्ग ४०० क्यूसेक्सने कमी करून ३५० करण्यात आला. मागील दहा दिवसांमध्ये धरणातील पाण्याची पातळी वाढली आणि शनिवारी (ता.१९) रात्री धरण १०० टक्के भरून धरणात ११.९१ टीएमसी पाणीसाठा झाला.

शनिवारी रात्री बारा वाजता वीजनिर्मिती केंद्रातून पुन्हा ७५० क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. गेल्यावर्षी १३ ऑगष्टला नीरा-देवघर धरण शंभर टक्के भरले होते. नीरा-देवघर धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढून धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यास धरणाच्या सांडव्याचे दरवाजे उघडण्यात येणार असल्याचे निरा पाटबंधारे विभागाचे श्रेणी १ चे सहाय्यक अभियंता योगेश भंडलकर यांनी सांगितले.

याशिवाय तालुक्यातील ब्रिटीशकालीन भाटघर धरणातही ८८.०६ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी भाटघर धरण १२ ऑगष्टला भरून धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले गेले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT