Nivrutti Maharaj Indurikar sakal
पुणे

Nivrutti Maharaj Indurikar : समाजसेवा करणारे योद्धा ग्रुप प्रत्येक गावात तयार झाले पाहिजेत

आजचा तरुण हा राष्ट्राचा कणा आहे. तरुणांनी व्यसनापासून दूर राहून निरोगी राहिले पाहिजे. व राष्ट्राचा कणा मजबूत ठेवला पाहिजे.

सकाळ वृत्तसेवा

डोर्लेवाडी - आजचा तरुण हा राष्ट्राचा कणा आहे. तरुणांनी व्यसनापासून दूर राहून निरोगी राहिले पाहिजे. व राष्ट्राचा कणा मजबूत ठेवला पाहिजे. मेखळी येथील योद्धा ग्रुपने कोरोना काळात केलेले कार्य प्रशंसनीय आहे.

प्रत्येक गावात एक योद्धा ग्रुप तयार झाला पाहिजे, व येणाऱ्या काळात आपला धर्म व गाय वाचवली पाहिजे. असे मत समाजप्रबोधन कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी व्यक्त केले.

मेखळी (ता. बारामती) येथील कोविड काळात स्थापन झालेल्या योद्धा सोशल फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या किर्तनाच्या कार्यक्रमात इंदुरीकर महाराज बोलत होते.

यावेळी टी डी एम या मराठी चित्रपटाचे निर्माते भाऊराव कराडे व चित्रपटाची संपूर्ण टीम, विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचे OSD हनुमंत पाटील, अभिनेता पृथ्वीराज थोरात, कवी हनुमंत चांदगुडे, गायक किरण महाराज, सचिन देशमुख, ईश्वर माने, कपिल चव्हाण, वादक प्रवीण चव्हाण, गोरख कुंभार व वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थी, भजनी मंडळ, योद्धा ग्रुपचे सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इंदुरीकर महाराज म्हणाले, सध्या प्रत्येक जण सत्ता आणि पैसा यामागे धावत असून, त्यामुळे समाजभान विसरलेली तरुण पिढी तयार होत आहे. सध्या मोबाईलच्या अति वापरामुळे तरुण पिढी पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण जास्त करायला लागली आहेत. आपली मुले संस्कारक्षम असली पाहिजेत,त्यासाठी सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

कोरोनाच्या महाभयंकर काळात येथील योद्धा ग्रुपने रुग्णांना दवाखान्यात दाखल करण्यासाठी मदत करणे, ऑक्सिजन बेड उपलब्ध करणे, औषधोपचार मिळवून देणे, भोजनाची सोय करणे, कुटुंबियांना मानसिक आधार देणे, गावात औषध फवारणी करणे आदी प्रकार सेवा करून समाजात आदर्श निर्माण केला आहे. या समाजिक संस्थेचे कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे. असे समाजसेवा करणारे योद्धा ग्रुप प्रत्येक गावात तयार झाला पाहिजेत. असे मत इंदुरीकर महाराजांनी व्यक्त केले.

टीडीएम चित्रपटाच्या टीमने यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. ग्रामीण भागातील तरुणांना घेऊन त्यांचे प्रश्न मांडणारा हा सिनेमा करण्यात आला आहे. सर्वांनी चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा पहावा असे आवाहन चित्रपटाचे निर्माते भाऊराव कराडे यांनी यावेळी केले. योद्धा ग्रुपच्या सदस्यांनी कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर व टी डी एम चित्रपटाच्या टीमचा सत्कार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

MLA Prakash Solanke : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रकाश सोळंके यांचा पाठिंबा; सोशल मीडियावर 'मी येतोय तुम्ही या'चे आवाहन

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

SCROLL FOR NEXT