dr. madhavan nair rajeevan
dr. madhavan nair rajeevan 
पुणे

पावसाळ्यात ‘एल निनो’ची भीती नाही - डॉ. माधवन नायर राजीवन

सकाळवृत्तसेवा

पुणे - येत्या पावसाळ्यात प्रशांत महासागरातील उष्ण पाण्याचा प्रवाह (एल निनो) हा अडथळा राहणार नाही, अशी दुष्काळाशी सामना करणाऱ्या महाराष्ट्राला दिलासा देणारी माहिती हवामान खात्याने आज दिली.

या वर्षी पावसाने ओढ दिल्याने डिसेंबरअखेरपासूनच राज्याच्या वेगवेगळ्या भागात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर येथे झालेल्या एका कार्यक्रमात पत्रकारांनी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. माधवन नायर राजीवन यांच्याशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले, ‘‘आत्तापर्यंत ‘एल निनो’ विकसित झालेला नाही. त्यामुळे येत्या पावसाळ्यामध्ये ‘एल निनो’ हा अडथळा असणार नाही. याच्या प्रगतीवर आम्ही बारकाईने नजर ठेवून आहोत. त्यामुळे त्याचा विकास कसा होतोय, यावर आमचे लक्ष आहे.’’

या वर्षी थंडीचा कडाका वाढला आहे, याबद्दल बोलताना डॉ. राजीवन म्हणाले, ‘‘या वर्षी संपूर्ण जगात थंडीची तीव्रता वाढली आहे. पृथ्वीच्या ध्रुवांवरही मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी झाली आहे. भारतात हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये हिमवृष्टी होत आहे. तसेच, युरोपमध्येही यंदा बर्फ पडण्याचे प्रमाण वाढले आहे. भारतात ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ प्रमाणही या वर्षी वाढले आहे. पण, यातून भारतातील सपाट मैदानात पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे उत्तर प्रदेश, हरियाना, पंजाब, दिल्ली या प्रदेशात तेथील सरासरीच्या तुलनेत आत्ता कमी प्रमाणात पाऊस नोंदला गेला आहे. पण, त्या जम्मू आणि काश्‍मीर, हिमाचल प्रदेश या भागात हिमवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा हिमवृष्टी जास्त होत आहे.’’

उत्तरेकडून थंडीची लाट आहे. तेथून दक्षिणेच्या दिशेने थंड आणि कोरडे वारे वाहत आहेत. त्यामुळे मध्य भारत आणि दक्षिण भारताच्या काही भागात दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान नोंदले गेले आहे. पुढील चार ते पाच दिवस ही थंडी कायम राहील, असा अंदाज आहे.
- डॉ. के. एल. रमेश, महासंचालक, भारतीय हवामान विभाग

निसर्ग समतोल साधतो...
जागतिक वातावरणातील बदलांमुळे हिवाळा कमी होत असल्याच्या जोरदार चर्चा सर्वत्र होतात. पण, निसर्ग समतोल साधत असल्याचे यंदाच्या थंडीने स्पष्टपणे दाखवून दिले आहे. या निसर्गाचे संवर्धन आपण केले पाहिजे, अशी अपेक्षाही डॉ. राजीवन यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT