No Lockdown needed in pune Mayor Muralidhar mohol 
पुणे

पुण्यात लॉकडाऊन होणार की नाही? वाचा, महापौर काय म्हणाले?

सकाळवृत्तसेवा

पुणे : शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली, तरी परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात आहे. त्यामुळे शहरात पुन्हा लॉकडाउन करणे योग्य नाही, अशा शब्दात महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मंगळवारी विरोध केला .आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना बाधितांची संख्या वाढत असलेल्या शहरांमध्ये लॉकडाउन करण्याबाबतचे संकेत काल दिले होते. या पार्श्वभूमीवर महापौर मोहोळ यांनी लॉकडाउनला विरोध केला. ते म्हणाले, ‘‘कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता टाटा व आयसर या संस्थांच्या सर्व्हेनुसार, सध्या आपण जे निर्बंध लावले आहेत. त्याची अधिक कडक अंमलबजावणी करणे आता गरजेचे बनले आहे. या निर्बंधांमध्ये आणखी वाढ करण्यात येईल परंतु पूर्णतः: लॉकडाउन हा त्यावरील मार्ग नाही.’’

शहरातील रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर महापालिका तीन आघाडीवर काम करणार आहे. यात सक्षम आरोग्य यंत्रणा उभारून, रुग्णांना बेडची उपलब्धता करून देणे, जास्तीत जास्त संशयित व्यक्तींची तपासणी करणे याचबरोबरच निर्बंधांची कडक अंमलबजावणी करून अधिकचे निर्बंध आणणे व लसीकरणाचा वेग वाढविणे यांचा समावेश असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 पुणे शहरातील कोरोना दिवसभरातील स्थिती
पुणे शहरात काल(ता.23) दिवसभरात 11310 रुग्णांची कोरोना चाचणी झाली त्यापैकी एकूण 3098 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. 22 रुग्णांचा मृत्यू झाला तर 1698 कोरोना रुग्णांना डिचार्ज मिळाला आहे.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 PLAYOFF SCENARIO: सनरायझर्स हैदराबादचा विजय, पण गुजरात टायनट्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचले? 'बाय वन गेट वन' ऑफर

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान संपले? SRHने विजयासह GT ला अंतिम ४ मध्ये पोहोचवले; १ जागा ३ स्पर्धक...

IPL 2026 Controversy : संजू सॅमसनने विजेच्या वेगाने बेल्स उडवल्या... OUT होताच हेनरिच क्लासन खवळला, अंगावर धावला Video

Gautam Adani: अमेरिकेत गौतम अदानींचा मोठा विजय! US मधील खटला कायमचा बंद; न्याय विभागाने आरोप मागे घेतले

Pune Council Seat Battle: पुणे विधान परिषद जागेसाठी राष्ट्रवादी-भाजपमध्ये रस्सीखेच

SCROLL FOR NEXT