पुणे

पीएलआय योजनेपासून लांब असलेल्या इलेक्ट्रिक दुचाकी वाहन कंपन्यांच्या वृध्दी दरात घसरण

CD

बिगर ‘पीएलआय’ ईव्ही कंपन्यांची वाढ संथ

नवी दिल्ली, ता. २७ ः उत्पादन निगडित सवलत (पीएलआय) योजनेचा लाभ घेत नसलेल्या इलेक्ट्रिक दुचाकी वाहन कंपन्यांच्या वाढीत मोठी घट झाली असल्याचे सेंटर फॉर डिजिटल इकॉनॉमी पॉलिसी रिसर्चने आपल्या ताज्या अहवालात म्हटले आहे. ‘पीएलआय’ योजनेचा लाभ घेणाऱ्या कंपन्यांकडून देशातंर्गत बाजारपेठेतील पकड मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच्या परिणामी चीनी कंपन्यांकडून जागतिक इलेक्ट्रिक दुचाकी वाहन बाजारपेठ व्यापली जात असल्याचा इशारा या अहवालात देण्यात आला आहे.
इलेक्ट्रिक दुचाकींच्या एकूण निर्यातीपैकी ७७ टक्के निर्यात बिगर ‘पीएलआय’ कंपन्यांकडून केली जात आहे, तर ‘पीएलआय’ योजनेचा लाभ घेणाऱ्या कंपन्यांकडून कमी निर्यात होत आहे, असे सेंटर फॉर डिजिटल इकॉनॉमी पॉलिसी रिसर्चचे अध्यक्ष जयजीत भट्टाचार्य यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. इलेक्ट्रिक दुचाकी वाहन उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने २०२१ मध्ये ‘पीएलआय’ योजना सादर केली होती. मागील सहा वर्षांच्या काळात या उद्योगाची व्याप्ती वाढली असली, तरी प्रामुख्याने या योजनेचा फायदा घेत असलेल्या कंपन्या प्रगतीपथावर आहेत. मात्र, बिगर ‘पीएलआय’ कंपन्यांच्या वाढीच्या दरात मागील काही वर्षांत मोठी घसरण झाली आहे. या कंपन्यांच्या वाढीचा दर २०२२ मध्ये ४०७ टक्के होता. नंतरच्या काळात त्यात घसरण झाली, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात बेसिक पे 69000 रुपये, वार्षिक वाढ 6 टक्के; 51 पानांचं निवेदन

Radhanagari Bee Attack: रक्षाविसर्जनाला कावळ्याची वाट पाहणं पडलं महागात! कावळ्यासोबत मधमाशा आल्या अन्; १०० जखमी तर १२ गंभीर, लोकांना पळता भुई थोडी, व्हिडिओ व्हायरल

Ruturaj Gaikwad: 'काळजी नको, लवकरच मी...', ऋतुराज खराब फॉर्मवर स्पष्ट बोलला; CSK च्या खराब फिल्डिंगबद्दल काय म्हणाला?

Latest Marathi News Live Update: नेस्को सेंटर मध्ये ड्रग्स पार्टी प्रकरणात लायझनिंग करणारा इंद्रजीत सिंग याला तात्काळ अटक करा; मनसेची मागणी

चौधरी बिहारचे नवे 'सम्राट', मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ; दोन उपमुख्यमंत्र्यांचाही शपथविधी, नितीशकुमार उपस्थित

SCROLL FOR NEXT