pune.jpg
pune.jpg 
पुणे

मासे मृत्यूप्रकरणी देहू ग्रामपंचायतीला नोटीस ; प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई

ok

पिंपरी : देहू येथील इंद्रायणी नदीच्या पात्रात हजारो मासे मृत झाल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ देहू ग्रामपंचायतीला नोटीस बजावली आहे. गावातील सांडपाणी थेट नदीमध्ये मिसळत असल्यामुळे तेथील प्रदूषणात वाढ झाल्याचा निष्कर्ष मंडळाने केलेल्या पाहणीतून समोर आला आहे. दरम्यान, दूषित पाण्याच्या प्रकारामुळे आषाढी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. 

याबाबत देहूचे ग्रामविकास अधिकारी अर्जुन गुडसुरकर म्हणाले, "गावातील सांडपाणी नदीत सोडण्यात येत आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर ही अडचण सुटणार आहे.'' प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याने वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांनी नदीच्या पाण्याबाबत सतर्कता बाळगावी असे, आवाहन संत तुकाराम महाराज संस्थानकडून करण्यात आले आहे.

हवेलीचे प्रांताधिकारी सचिन बारवकर म्हणाले, "देहूतील इंद्रायणीचे प्रदूषणाचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून (एमपीसीबी) लवकरच मिळेल. तसेच तळेगाव, इंदोरी येथील एमआयडीसीमधून काही सांडपाणी आले असल्यास त्यावरही कार्यवाही होईल. पालखी सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर पाटबंधारे विभागाला नदीत पाणी सोडण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. पाणी सोडल्यामुळे प्रदूषण कमी होईल.'' 

प्रकल्प 95 टक्के पूर्ण 
गावाची 38 हजार लोकसंख्या गृहीत धरून राज्य सरकारने 2015 मध्ये तीन एमएलडी क्षमतेचा मैला शुद्धीकरण प्रकल्प बांधण्यास सुरू केला. हा प्रकल्प जून 16 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, तो झाला नाही. त्यामुळे सरकारने हा प्रकल्प सार्वजनिक बांधकाम खात्याकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वर्ग केला. त्याची कालमर्यादा 2019 पर्यंत असल्याचा दावा जीवन प्राधिकरण करत आहे. या भागातील माळवाडी, देहू, विठ्ठलवाडी येथे वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी सरकारने 14 कोटींऐवजी 31 कोटी रुपये मंजूर केले आहे. आता ही योजना 95 टक्के पूर्ण असल्याचा दावा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता धनंजय जगधने यांनी केला आहे. 

टोपोग्राफिकल सर्व्हे महत्त्वाचा 
पिंपरी-चिंचवडमध्ये 13 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित असून त्यापैकी इंद्रायणी नदीलगत चार आणि पवना नदीलगत नऊ प्रकल्प आहेत. महापालिकेने चार नवीन प्रकल्प प्रस्तावित केले असून त्यामध्ये पवना नदीलगत एक, इंद्रायणी नदीलगत दोन आणि मुळा नदीच्या परिसरात एक प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प हे लोकसंख्येचा विचार करून करण्यात येत असले तरी त्यासाठी टोपोग्राफिकल सर्व्हे महत्त्वाचा असतो. 

''नदीतील मासे मृत झाल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या भागाची पाहणी केली आहे. नदीमधील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. नदीमध्ये येणारे सांडपाणी हे देहू गावामधूनच येत असल्याने ग्रामपंचायतीला नोटीस बजावली आहे. नोटीस मिळाल्यापासून दोन दिवसांमध्ये याचा खुलासा न केल्यास ग्रामपंचायतीविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल.''
- दिलीप खेडकर, प्रादेशिक अधिकारी, एमपीसीबी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा स्कॅंडल प्रकरणात जनता दल सेक्युलर पक्षाची मोठी कारवाई

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

SCROLL FOR NEXT