pune municipal corporation sakal
पुणे

आरक्षणाची जागा ताब्यात देऊनही महापालिकेची नोटीस

आरक्षणाची जागा महापालिकेच्या ताब्यात दिली, फेरफार आणि सातबारा उतारादेखील महापालिकेच्या नावावर झाला. तरी देखील मिळकतकर भरण्यासाठी अद्यापही मला नोटीस येणे सुरूच आहे.

सकाळ वृत्तसेवा

आरक्षणाची जागा महापालिकेच्या ताब्यात दिली, फेरफार आणि सातबारा उतारादेखील महापालिकेच्या नावावर झाला. तरी देखील मिळकतकर भरण्यासाठी अद्यापही मला नोटीस येणे सुरूच आहे.

पुणे - आरक्षणाची जागा महापालिकेच्या ताब्यात दिली, फेरफार आणि सातबारा उतारादेखील महापालिकेच्या नावावर झाला. तरी देखील मिळकतकर भरण्यासाठी अद्यापही मला नोटीस येणे सुरूच आहे. जुनी इमारत पाडून नवीन इमारत बांधली, जुन्या आणि नव्या इमारतीचा अशी दोन्ही मिळकत कराची बिले येतात. पुनर्विकास करण्यासाठी इमारत पाडली, तर मोकळ्या जागेची कर आकारणी सुरू करण्यात आली.

या व अशा असंख्य तक्रारी पुणेकरांच्या आहेत. आरक्षणाची जागा महापालिकेच्या ताब्यात दिल्यानंतर मिळकत कर शून्य केला पाहिजे. परंतु महापालिकेतील दोन खात्यांमध्ये समन्वय नसल्यामुळे त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे मिळकत करापोटी कोट्यवधी रुपयांची थकबाकी असल्याचे दिसून येते. प्रत्यक्षात प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा परिणाम असल्याचे यातून समोर आले आहे.

काय आहेत तक्रारी?

  • महापालिकेच्या विकास आराखड्यात एखाद्या खासगी जागेवर आरक्षण टाकले जाते

  • त्या आरक्षणाची जागा संबंधित जागामालकाने महापालिकेच्या ताब्यात दिल्यानंतर संबंधित मालकाचे नाव मिळकतकराच्या बिलातून कमी होणे अपेक्षित

  • मात्र ते केले जात नाही

  • दरवर्षी संबंधित जागेच्या मालकाला मिळकतकराचे बिल पाठविले जाते

  • वास्तविक मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून याबाबतची माहिती घेऊन मिळकत विभागाने परस्पर ही दुरुस्ती करून घेणे अपेक्षित

  • तरीदेखील ती वर्षानुवर्षे होत नाही

चला, आवाज उठवू...

मिळकतकर आकारणीबाबत यंदा पुणे महापालिकेने कधी नव्हे एवढा घोळ घातला आहे. याचा आर्थिक फटका नागरिकांना बसत आहे. याबाबत आपल्या प्रतिक्रिया नावासह editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.

दुहेरी आकारणी

एका कंत्राटदार कंपनीच्या चुकीचा फटका महापालिका आणि नागरिकांना सोसावा लागत आहे. असे असताना जमिनींच्या वापरातील बदलानुसार मिळकतकराच्या आकारणीतसुद्धा बदल झाला पाहिजे. परंतु तो होताना दिसत नाही. त्यातून अनेक नागरिकांकडून दुहेरी मिळकतकराची आकारणी केली जात असल्याचे वरील उदाहरणावरून समोर आले आहे.

सातबारा उताऱ्यावर महापालिकेचे नाव लागले आहे. तरीदेखील आजही मूळ मालक व कुलमुखत्यारधारक यांच्या नावाने थकबाकीच्या नोटिसा व जप्तीचे वॉरंट काढण्यात येत आहे.

- राम रतन गुप्ता, पाषाण

माझी मोकळी जागा होती. ती विकसन करण्यासाठी एका व्यावसायिकाला दिली. नवीन सदनिकाधारकांना मिळकतकराची आकारणी सुरू झाली. परंतु आजपर्यंत मोकळ्या जागेचा कर शून्य न झाल्यामुळे मिळकत कर भरा अशा नोटिसा दरवर्षी मला येतात. मी ८६ वर्षांचा असून त्यामुळे विनाकारण मला हा त्रास सहन करावा लागत आहे.

- संतोष कुलकर्णी, धायरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान लज्जास्पद कृत्य, स्वयंसेवकाने महिलेला लाथ मारली, व्हिडिओ व्हायरल

ना ओमप्रकाश ना इंद्रजीत हा आहे भैरवीचा खऱ्या आयुष्यातील जोडीदार ; थाटात पार पडला साखरपुडा

iPhone 17 लॉन्चपूर्वीच Apple अडचणीत; कंपनीवर कॉपीराइटचा खटला दाखल, ग्राहकांसोबत मोठी.....नेमकं प्रकरण काय?

Latest Marathi News Updates : अमरावतीमधील शिरजगाव मोझरी येथे जाणवले भूकंपाचे सौम्य झटके

रोहित, विराटविना प्रथमच मोठी स्पर्धा; Asia Cup गाजवण्याचं भारतीय संघापुढे आव्हान

SCROLL FOR NEXT