India vs Pakistan अन् मोहसिन नक्वी पुन्हा 'राडा'! पुढील महिन्यात Asia Cup मध्ये हायव्होल्टेज सामना; जाणून घ्या डिटेल्स

Emerging Asia Cup renamed as Rising Stars tournament : भारत-पाकिस्तान सामना आणि नाट्य, ही दोन शब्दं आली की चाहत्यांच्या अंगात चैतन्य येतं. पुन्हा एकदा असा ‘हायव्होल्टेज’ सामना रंगणार आहे आणि त्या निमित्ताने पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांचा पाणउतार करण्याची पुन्हा संधी मिळणार आहे.
Emerging Asia Cup Renamed as Rising Stars Asia Cup – India vs Pakistan Clash Confirmed!

Emerging Asia Cup Renamed as Rising Stars Asia Cup – India vs Pakistan Clash Confirmed!

esakal

Updated on

India vs Pakistan match in Rising Stars Asia Cup 2025 : आशिया चषक स्पर्धेच्या विजेतेपदाची ट्रॉफी अद्याप भारतीय संघाला मिळालेली नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी ( Mohsin Naqvi) यांनी ती ट्रॉफी लंपास केली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने दुबईत पाकिस्तानचे एक नव्हे तर तीन सामन्यांत वस्त्रहरण केले. त्यानंतर जेतेपदाची ट्रॉफी नक्वींच्या हस्ते स्वीकारण्यास नकार देऊन, त्यांना त्यांची जागा दाखवली. आता हे सर्व पुन्हा एकदा पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको, कारण नोव्हेंबरमध्ये आणखी एक आशिया चषक स्पर्धा होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com