notice send by police to MNS Party workers at Pune
notice send by police to MNS Party workers at Pune  
पुणे

पुण्यातही मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी बजावल्या नोटीस

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज मुंबईमध्ये सक्तवसुली संचनालयाच्यावतीने (ईडी) होणाऱ्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर मुंबईनंतर पुणे शहरातील शंभरहून अधिक प्रमुख कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी नोटीस बजावली आहे. 

गुरुवारी (ता. 22) सकाळी मुंबई येथील ईडीच्या कार्यालयात राज ठाकरे यांची चौकशी होणार आहे. त्यासाठी मुंबईमध्ये मनसेच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुण्यात मनसेच्या कार्यकर्तेची संख्या जास्त आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी पुणे पोलिसांनी मनसेच्या प्रमुख 100 हुन  अधिक कार्यकर्तेना 149 अंतर्गत नोटीस बजावली आहे. कार्यकर्तेनी कोणताही अनुचित प्रकार करु नये, यासाठी पोलिसांनी नोटीस बजावून त्यांना समंस दिली आहे.

"शहरातील मनसे कार्यकर्त्यांकडून कोणत्याही प्रकारे शांतता भंग होऊ नये, यासाठी 149 अंतर्गत नोटीस बजावली आहे.शहरात शांतता आहे, कोणताही अनुचित प्रकार नाही." असे विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त मितेश घट्टे यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला तिसरा धक्का, कर्णधार केएल राहुलपाठोपाठ दीपक हुड्डाही आऊट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT