पुणे

कोल्हापूर:नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यासाठी १३ लाख टन साखर

CD

नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यासाठी
१३ लाख टन साखर कोटा

अॅग्रोवन वृत्तसेवा
कोल्हापूर : केंद्र सरकारने नोव्हेंबर २०२६ च्या दुसऱ्या पंधरवड्यासाठी देशांतर्गत साखर विक्रीचा १३ लाख टनांचा कोटा निश्चित केला आहे. अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने शुक्रवारी (ता. १३) याबाबतचा आदेश जारी केला. हा कोटा १६ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत लागू राहणार आहे.
विशेष म्हणजे, नोव्हेंबरमध्ये उत्पादित होणारी साखर निर्धारित विक्री कोट्याव्यतिरिक्त विकण्यासही केंद्र सरकारने साखर कारखान्यांना परवानगी दिली आहे. नोव्हेंबरमध्ये गाळप सुरू करणाऱ्या तसेच ऑक्टोबरमध्येच गाळप सुरू केलेल्या कारखान्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. ऑक्टोबरमध्ये गाळप सुरू केलेल्या कारखान्यांना त्या महिन्यात उत्पादित झालेली साखर नोव्हेंबरमध्ये विकण्याची परवानगी यापूर्वीच देण्यात आली आहे.
नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यासाठीही सरकारने १३ लाख टन साखर विक्रीचा कोटा निश्चित केला होता. त्यामुळे संपूर्ण नोव्हेंबर महिन्यासाठी नियमित विक्री कोटा २६ लाख टन झाला आहे. याशिवाय, नोव्हेंबरमध्ये उत्पादित साखरेच्या विक्रीला स्वतंत्र परवानगी दिल्याने बाजारातील साखरेची उपलब्धता वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ऑक्टोबर २०२६ साठी केंद्राने एकूण ३० लाख टन साखर विक्री कोटा निश्चित केला होता. त्यामध्ये पहिल्या पंधरवड्यासाठी १४ लाख टन, तर दुसऱ्या पंधरवड्यासाठी १६ लाख टनांचा समावेश होता. गत वर्षी ऑक्टोबर २०२५ मध्ये देशांतर्गत विक्रीसाठी २४ लाख टनांचा मासिक कोटा देण्यात आला होता.
केंद्र सरकारने मासिक कोटा पद्धतीऐवजी पंधरवड्यानुसार कोटा निश्चित करण्याची पद्धत सुरू केली आहे. त्यानुसार नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यासाठी जाहीर झालेला हा सहावा कोटा आहे. देशांतर्गत बाजारातील साखरेचा पुरवठा नियंत्रित ठेवणे, मागणी आणि उपलब्धतेचा समतोल राखणे तसेच दरांमधील मोठे चढ-उतार रोखणे, हा या निर्णयामागील उद्देश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! भरधाव कंटेनरने २२ वाहनांना फरफट नेले अन्...

Bombay High Court : पती-पत्नीच्या वादातील एका वाक्याला जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याचा आधार मानता येणार नाही; उच्च न्यायालयाचा निर्णय

Navi Mumbai: पुरस्कारावरून श्रेयवाद! गणेश नाईकांच्या भूमिकेवर नवी मुंबईत चर्चा

Tulsi Vivah 2026: तुळशी विवाहाचा मुहूर्त आला जवळ! या दिवशी घराघरांत होणार मंगल सोहळा; जाणून घ्या तारिख आणि शुभ मुहूर्त

Latest Marathi News Live Update : बुलढाणा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात !

SCROLL FOR NEXT